चालू घडामोडी | 25 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 व 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल यांच्या दरम्यान “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला होता.

2) अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (ACC&S) परीक्षण स्थळी लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर यशस्वीरित्या नेम धरून मारा करण्यात आला. लेझर गाइडेड ATGMचा वापर त्यातल्या लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो. सध्या MBT अर्जुन या रणगाड्याच्या तोफेमधून त्याच्या तांत्रिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जात आहेत. आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (ARDE), पुणे यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

3) जी -4 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी- भारत, ब्राझील, जपान आणि जर्मनी यांनी समकालीन वास्तवाचे अधिक चांगले प्रतिबिंब होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा करण्याची आणि तिची मुख्य निर्णय घेणारी संस्था अद्ययावत करण्याच्या निकडवर प्रकाश टाकला आहे.

4) युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थेच्या “युवाह / YuWaah” नामक एका व्यासपीठाच्या माध्यमातून भारतीय युवांमध्ये स्वयंसेवेची भावना वाढविण्यासाठी तसेच प्रशिक्षण देण्यासाठी भागीदारीत काम करण्यासाठी एका आशय-पत्रावर स्वाक्षरी केली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

5) उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ (UTDB) आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) यांनी राज्यातील टिहरी तलावावर साहसी खेळांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली.

6) संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि टून्झा इको-जनरेशन या संस्थेकडून खुशी चिंदलिया या 17 वर्षांच्या मुलगीची निवड भारतासाठीची प्रादेशिक राजदूत म्हणून करण्यात आली आहे. ती हवामानातले बदल आणि पर्यावरणीय संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरणीय खजिन्याचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेबद्दल जगजागृती करणार. ती टुन्झा इको-जनरेशन या संस्थेसोबत विविध कार्यक्रमांवर फेब्रुवारी 2021 पर्यंत काम करणार.

7) राज्यसभेने तीन कामगार कोड पास केले, (i) औद्योगिक संबंध कोड, 2020  (ii) व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यकारी अटींचा कोड, 2020  (iii) सामाजिक सुरक्षा कोड, 2020

2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य:

डॉ हर्ष वर्धन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांचे सभासद, संयुक्त राष्ट्रसंघ संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी आणि भागीदारी संस्था यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. भारताने 2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

म्हणजेच जागतिक शाश्वत ध्येयाच्या 2030 सालाच्या मुदतीपूर्वी साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2016 साली रुग्णांच्या एक दशलक्ष संख्येवरुन ही संख्या 2019 साली अर्ध्या दशलक्षावर आली. वर्ष 2020 मध्ये 2.4 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एक तृतीयांश नोंदी खासगी क्षेत्राच्या मदतीने केल्या गेल्या आहेत.

अणू शास्त्रज्ञ पद्मश्री शेखर बसू यांचं निधन :

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं करोनामुळे निधन झालं. अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते.

देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. खास बाब म्हणजे डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी देखील तयार केली होती.

Leave a Reply