चालू घडामोडी | 25 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) शिक्षणाचे चांगले वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तामिळनाडू सरकार 80,000 सरकारी शाळांमध्ये स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना राबवित आहे.

2) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला सुमारे 1.8 अब्ज डॉलर किंमतीची शस्त्रे विक्रीस मान्यता दिली आहे.

3) 22 ऑक्टोबर 2020 रोजी कोची येथे डोर्निअर विमानावरील महिला पायलटची भारतीय नौदलाची पहिली तुकडी दाखल झाली.

4) भारताच्या मदतीने भुटान देशात बांधण्यात आलेल्या मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रिटनच्या इंस्टीट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स या संस्थेच्यावतीने प्रतिष्ठित ‘ब्रुनेल पदक’ बहाल करण्यात आले.

5) भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर येथे ‘कोविरॅप’ नामक कोविड-19 निदान चाचणी यंत्र विकसित करण्यात आले. त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता देण्यात आली आहे.

6) उत्तराखंड राज्यात “आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी” हा दर्जा देण्यात आलेला ‘असन संवर्धन प्रकल्प’ आहे. ते राज्यातले पहिले रामसार स्थळ आहे ज्याला हा दर्जा प्राप्त झाला. ‘असन संवर्धन प्रकल्प’ यमुना नदीच्या किनारी देहरादून जवळ गढवाल भागात आहे. असन संवर्धन प्रकल्पाच्या समावेषासोबतच हा दर्जा प्राप्त करणाऱ्या भारतातल्या स्थळांची संख्या 39 इतकी झाली.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे :

35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

ठळक बाबी

  • ILOच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रम व रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची निवड झाली आहे.
  • ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळासाठी ही निवड झाली आहे.
  • येत्या नोव्हेंबरमध्ये प्रशासक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद अपूर्व चंद्रा भूषवणार आहेत.

नीता कुलकर्णी, निखिल दाते यांना ‘मसाप’चा मोरेश्वर नांदूरकर उत्तेजन पुरस्कार :

‘रसिक साहित्य’च्या माध्यमातून साहित्य क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणारे मोरेश्वर नांदूरकर यांच्या नावाने दिला जाणारा यंदाचा संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदूरकर संपादक उत्तेजन पुरस्कार नीता कुलकर्णी (पुणे) यांना जाहीर झाला आहे.

तर पुस्तक विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदूरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि नांदूरकर कुटुंबीय यांच्यावतीने दिले जाणारे हे पुरस्कार मोरेश्वर नांदूरकर यांच्या जयंतीदिनी शनिवार 24 ऑक्टोबर रोजी पुणे येथे प्रदान केले जाणार आहेत.

25 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

औद्योगिक कामगारांसाठी 2016=100 या नव्या मालिकेवर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकांचे (CPI-IW) प्रकाशन :

केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) 2016 या आधारभूत वर्षानुसार नव्या मालिकेचे प्रकाशन झाले. श्रम विभागाने हा नवा निर्देशांक तयार केला आहे.

पूर्वीच्या 2001=100 या म्हणजेच आधारभूत वर्ष 2001 असलेल्या निर्देशाकांच्या जागी हा नवा 2016=100 निर्देशांक असणार आहे. यावेळी 2016 हे आधारभूत वर्ष धरुन सप्टेंबर 2020 या महिन्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्याच निर्देशांकाचेही प्रकाशन केले गेले.

सप्टेंबर महिन्याचा अखिल भारतीय निर्देशांक 118 च्या पातळीवर असून नव्या मालिकेचे जुन्या 2001=100 या आधारभूत मालिकेत रुपांतर करण्यासाठी जोडणारा दुवा 2.88 हा आहे. निर्देशांकात करण्यात आलेल्या सुधारणा, आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रमाणकांनुसार आहेत, ज्यामुळे याचे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून तुलनात्मक विश्लेषण करणे सोपे होणार. सरकारला कोणतेही धोरण ठरवायचे असल्यास ही आकडेवारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते.

Leave a Comment