चालू घडामोडी | 25 जून 2020

चीन ‘शस्त्रास्त्रे व्यापार संधि (ATT)’ यात सहभागी होणार :

जागतिक पातळीवर शस्त्रांच्या होत असलेल्या खरेदी-विक्रीला नियंत्रणात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 2013 सालाच्या ‘संयुक्त राष्ट्रसंघ शस्त्रास्त्रे व्यापार संधि (UN-ATT)’ या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय चीनने जाहीर केला आहे.

चीनने या करारामध्ये सामील होणे म्हणजे जागतिक शांती आणि स्थिरता राखण्यासाठी बहुपक्षीयतेला पाठिंबा देण्याच्या देशाच्या प्रयत्नांकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याच्या अंतर्गत, चीन सार्वभौम देशांकडेच लष्करी उत्पादने निर्यात करणार आणि ATT सदस्य नसलेल्या देशांकडे निर्यात करणार नाही.

2019 साली संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ATT संधिमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. यानंतर चीनने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा जबर फटकाः IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४.५ टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असेल, असं नाणेनिधीने म्हटलंय.

करोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पण यासोबतच २०२१मध्ये भारतयी अर्थव्यवस्थेत मोठी तेजी असेल आणि आर्थिक विकासदर हा ६ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दिलासाही नाणेनिधीने दिला आहे.

२०२० मध्ये जगाच्या आर्थिक विकासदर ४.९ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे. जागतिक आर्थिक परिदृश्याच्या (World economic scenario) अंदाजानुसार हा आकडा १.९ टक्कांनी खाली आहे. करोनाच्या या बिकट संकटात अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांनी घसरेल.

हा अंदाज ऐतिहासिक दृष्ट्या खाली आहे. ही स्थिती सर्वच देशांची आहे, असं आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितलं. करोना व्हायरसच्या संकटाचा २०२० मधील पहिल्या सहामाहितील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला. अपेक्षेपेक्षा जास्त व्यापक परिणाम दिसून आला.

तर २०२१ मध्ये जागतिक वृद्धी दर हा ५.४ टक्के असेल, असा अंदाज आहे. हा आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी आहे. २०२० मध्ये पहिल्यांदाच सर्व क्षेत्रात घसरण दिसून येणार आहे. चीनच्या आर्थिक विकासात पहिल्या तीमाहीनंतर सुधारणा होत आहे. यानुसार २०२० मध्ये चीनचा वृद्धी दर हा १.० टक्के असेल, असा अंदाज आहे.

UNRWA संस्थेला येत्या दोन वर्षात भारत 10 दशलक्ष डॉलरची देणगी देणार :

पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्याच्या उद्देशाने येत्या दोन वर्षांमध्ये 10 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम ‘युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज इन द नियर ईस्ट (UNRWA)’ या जागतिक संस्थेला आपल्या योगदानाच्या स्वरूपात देण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.

मुरलीधरन यांनी नुकत्याच झालेल्या आभासी UNRWA बैठकीत यासंबंधी घोषणा केली. हा निधी लोकांच्या विकासासाठी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळ उभे करण्यासाठी खर्च केला जाणार. ठळक बाबी : चालू वर्षासाठी 5 दशलक्ष डॉलरची देणगी देण्याचे भारत सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे.

हा निधी त्याच्या अतिरिक्त दिला जाणार आहे. नियमित सानुकूलित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त भारत सरकार पॅलेस्टीनी तरुणांना आणि अधिकाऱ्यांसाठी 250 वार्षिक शिष्यवृत्ती देखील प्रदान करणार आहे. पॅलेस्टिनी युवासाठी प्रवास सुरळीत होईपर्यंत आभासी मंचाद्वारे पुढील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची भारताची योजना आहे.

Leave a Reply