चालू घडामोडी | 25 फेब्रुवारी 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 25th February 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 22 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग  म्हणून पदभार स्वीकारणारी व्यक्ती – रिअर अॅडमिरल अतुल आनंद.
 • 23 फेब्रुवारी 2021 रोजी नौदलाच्या पूर्व विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून पदभार स्वीकारणारी व्यक्ती – रियर ॲडमिरल तरुण सोबती.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 फेब्रुवारी 2021 रोजी ____ येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली – पुडुचेरी.
 • 23 फेब्रुवारी 2021 रोजी गरीबी रेषेखालील कुटुंबांसाठी अपघात-सह-जीवन विमा योजना सुरू करणारे राज्य सरकार – तामिळनाडू.
 • या राज्य सरकारने ‘आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना’ सुरू केली आहे – उत्तरप्रदेश.
 • ‘कार्बन वॉच’ मोबाईल अॅप कार्यरत करून व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी यंत्रणा तयार करणारे भारतातील पहिले राज्य – चंदीगड केंद्रशासित प्रदेश.
 • मध्यप्रदेशातील होशंगाबाद शहराचे नवे नाव – ‘नर्मदापुरम’.
 • या राज्य सरकारने खेड्यातल्या लोकांच्या उत्पन्नासाठी ‘लाल लकीर’ अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे – पंजाब.
 • 1.32 लक्ष आसनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान जे 63 एकर क्षेत्रात पसरलेले आहे – नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात.
 • नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) नवे अध्यक्ष – विजय संपला.
 • प्रथमच, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या ‘हवामान बदल’ विषयक चर्चेत संस्कृत भाषेचा वापर करणारे भारतीय – प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री).
 • शहरी भारतासाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2021 रोजी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भागीदारीने गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने सुरू केलेला उपक्रम – राष्ट्रीय व शहरी डिजिटल अभियान (NUDM).
 • 23 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यरत झालेले ‘इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX)’ याचा विकास स्मार्ट सिटीज मिशन आणि ___ यांनी केला – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू.
 • 24-27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ____ येथे आंतरराष्ट्रीय मोठी धरणे आयोग (INCOLD) यांच्यावतीने “धरणे व नदी पात्रांचा शाश्वत विकास’ विषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले – नवी दिल्ली.

Leave a Comment