चालू घडामोडी | 25 ऑगस्ट 2020

0

भारतात 2036 साली स्त्रियांची संख्या अधिक असणार: राष्ट्रीय लोकसंख्या आयोग

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने 15 वर्षांसाठी लोकसंख्येचा अंदाज दर्शविणारा एक अहवाल तयार केला आहे. अहवालात वर्ष 2011 ते वर्ष 2036 मधील लोकसंख्येविषयी अंदाज दिला आहे. 2011च्या लोकसंख्येच्या तुलनेत 2036 साली स्त्रियांची संख्या पुराउषयांच्या तुलनेत अधिक असणार, असे अभ्यासातून दिसून आले आहे.

देशातले सरासरी लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या) 2011 साली 943 होते. ते 2036 साली 957 होण्याची अपेक्षा आहे. नवजात मृत्यु दर (IMR) 2031-35 पर्यंत 30 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, जी सर्व राज्यांमध्ये दिसून येणार. 2036 पर्यंत भारताची लोकसंख्या 151.8 कोटी पर्यंत जाणार.

मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.

सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.

आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.

इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड :

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 31 वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे.

गेल्या 13 वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला. इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

वन लाइनर चालू घडामोडी

  • हिमांशू सिंगने “कोड ग्लेडिएटर्स 2020” हा पुरस्कार जिंकला. हिमांशू सिंग वाराणसीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (BHU) माजी विद्यार्थी आहे. टेकगिग संस्थेनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
  • अखंडित पुरवठा साखळी रहावी या हेतूने ‘सप्लाय चेन रेझिलन्स’ उपक्रम राबविण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान हे देश एकत्र येण्याची योजना तयार करीत आहेत.
  • केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्यावतीने  सुवर्ण दागदागिने विक्रेते म्हणजेच जव्हेरींसाठी नोंदणी व नूतनीकरण तसेच परिक्षण व हॉलमार्किंग केंद्रांच्या अधिकृत मान्यता आणि नूतनीकरणाची ऑनलाइन प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे.
  • एअरटेल कंपनीने अंदमान व निकोबार बेटांवर त्यांची हाय-स्पीड 4G सेवा कार्यरत केली असून ती सेवा देणारी पहिली खासगी दूरसंचार कंपनी ठरली.
  • अश्वनी भाटिया यांची भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली आहे. ते पदावर 31 मे 2022 पर्यंत राहणार.
  • अतनू दास या खेळाडूला धनुर्विद्या या क्रिडा शाखेसाठी यंदाचा ‘अर्जुन पुरस्कार 2020’ देण्यात आला आहे.

Source :- Indiaeducationdiary, Embibe, Loksatta, StudyIQ, livemint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here