चालू घडामोडी | 24 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीतील महिला व बाल विकास मंत्रालयाशी सामंजस्य करार केला. पोषण अभियानाचा एक भाग म्हणून कुपोषणावर नियंत्रण ठेवण्याचे सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे.

2) युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि युनिसेफ चाईल्ड फंड (युनिसेफ) ने युवा जनतेला करियर तयार करण्यासाठी युववाह स्थापन करण्यासाठी भारतातील जागतिक बहु-भागधारक व्यासपीठ जनरेशन असीमित (जीनयू) सह स्टेटमेंट ऑफ इंटेंट (SoI) वर स्वाक्षरी केली आहे.

3) राज्यसभेने 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केले.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये नऊ महामार्ग प्रकल्प आणि घर तक फायबर योजना लॉंच केली आहे.

5) अभ्यास – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, DRDOकडून अंतरिम चाचणी रेंज, बालासोर ते ओडिशा येथे जलद गती वाढविणार्‍या एअर टार्गेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

6) तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातल्या कुलासेकरपट्टिनम येथे भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे. वर्तमानात, श्रीहरिकोटा येथे ISROचे एकमेव रॉकेट लॉंच पोर्ट आहे.

7) अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी 1971 सालाच्या अपोलो मोहिमेनंतर, आता “आर्टेमिस” मोहिमेच्या अंतर्गत 2024 साली पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरविणार आहे. तीन टप्प्यात ही मोहीम पूर्ण होणार आहे. त्यात 2 अंतराळवीर सामील असणार आहे आणि त्यात एक महिला असणार. ओरियन नावाच्या अंतराळ यानातून ते चंद्रावर जाणार आहेत.    

पंतप्रधान मोदींचा टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश :

अमेरिकेतील सुप्रसिद्ध नियतकालिक टाइम मॅगझिनने जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे.

परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

‘अभ्यास’ ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वी :

22 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने (DRDO) ओडिशा राज्यात ही चाचणी घेण्यात आली.

यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून ‘अभ्यास’चा उपयोग केला जाऊ शकतो.

‘अभ्यास’ची वैशिष्ट्ये

  • उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.
  • वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.
  • वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.
  • ‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.

रेल्वे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं निधन :

रेल्वे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. सुरेश अंगडी हे ६५ वर्षांचे होते. करोनाने निधन झालेले ते कर्नाटकातील दुसरे खासदार आहेत.

याआधी अशोक गस्ती यांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले. गस्ती हे राज्यसभेचे खासदार होते. चार वेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

Leave a Reply