चालू घडामोडी | 24 जून 2020

0

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘एच 1 बी’ व्हिसा थांबविले :

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच 1बी या व्यावसायिक व्हिसासह तेथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा वर्ष अखेरीपर्यंत थांबवले आहेत. एच 1बी व इतर प्रकारचे व्हिसा इ.2020च्या अखेरीपर्यंत थांबवण्यात आल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना धक्का बसला आहे.

भारत व चीन या देशांचे सर्वाधिक कर्मचारी एच १बी व्हिसावर अमेरिकेत जातात. या निर्णयाचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना सर्वाधिक बसणार असून अनेक भारतीय व अमेरिकी कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांसाठी एच 1बी व्हिसा अमेरिकी सरकारने दिले होते.

तर त्यांना आता अमेरिकेच्या राजनैतिक दूतावासांकडून मंजुरी मिळण्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कान फिल्म मार्केट 2020’ येथे आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन :

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘इंडिया पॅव्हिलियन’ या आभासी मंडपाच्या ई-उद्घाटनाने ‘कान फिल्म मार्केट 2020’ या चित्रपट महोत्सवामधल्या भारतीय सहभागाची सुरूवात झाली. 22 ते 26 जून 2020 या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • भारतातून कान चित्रपट महोत्सवाला दोन चित्रपट पाठवण्यात आले आहेत. यावर्षी, भारतीय पॅव्हिलियनमध्ये “माईघाटः क्राईम नंबर 103/2005” (मराठी) आणि “हेलारो” (गुजराती) या दोन्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येत आहे.
  • त्याशिवाय महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पुढील वर्षी असलेल्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या काही चित्रपटांचे आणि संगीत आणि माहितीपटांचे प्रदर्शन देखील केले जाणार आहे.
  • ही आभासी जागा आता वास्तविक भागीदाऱ्यांचे नवे स्थान म्हणून उदयाला येणार आहे. चित्रपट ही भारताची सॉफ्ट पॉवर म्हणजेच वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे आणि चित्रपट सुविधा कार्यालयाला केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक केंद्र बनविण्यात येणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात येऊन चित्रिकरण करण्याचे आणि जागतिक बाजारात या चित्रपटांचे वितरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कान चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅव्हिलियन हे नेहमीच विविध घडामोडींचे केंद्र ठरले आहे.

प्रथम आभासी ‘आरोग्यसेवा व वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शन 2020’ याचे मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन :

केंद्रीय नौवहन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दिनांक 22 जून 2020 रोजी भारताच्या सर्वात मोठ्या पहिल्या आभासी ‘आरोग्यसेवा व वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शनी 2020’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात आले. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) या संस्थेनी या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.

22 ते 26 जून 2020 या कालावधीत दररोज याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. ही भारतातली पहिली सर्वात मोठी आभासी प्रदर्शनी आहे, जी एक नवी सुरुवात आहे. हे एक नवीन मानक आहे, जिथे आभासी पद्धतीने व्यापार होणार कारण डिजिटल इंडिया आता आपला मार्ग प्रशस्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here