चालू घडामोडी | 24 जुलै 2020

0

महिलांना लष्करात ‘पर्मनंट कमिशन’; सरकारने काढला आदेश

लष्करी सेवेतील सर्व शाखांमधील महिला अधिकाऱ्यांना ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजे पुरुषांच्या बरोबरीने खुले करण्याचा औपचारिक आदेश केंद्र सरकारने गुरुवारी काढला. यामुळे देशाच्या लष्कर या सर्वात मोठ्या सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात येऊन महिलांचा ऐतिहासिक विजय झाला.

पूर्ण पेन्शनही मिळेल आधी ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’वर (एसएससी) 10वर्षे सेवा पूर्ण करणाºया फक्त पुरुष अधिकाऱ्यांनाच ‘पर्मनंट कमिशन’चा पर्याय निवडता येत होता. महिलांना अशा प्रकारे ‘कमांड पदां’पासून दूर ठेवले जायचे.

परिणामी, त्या सरकारी पेन्शनपासूनही वंचित राहायच्या. कारण पेन्शन 20वर्षांच्या सेवेनंतर लागू होते. त्यांना ‘पर्मनंट कमिशन’, ‘कमांड पद’ व पेन्शन हे तिन्ही लाभ मिळतील.

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष

रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.

2018 Asian Games : रौप्यपदक विजेत्या भारतीय रिले संघाला सुवर्णपदाचा मान

२०१८ साली जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये, ४ * ४०० मिश्र रिले प्रकारात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. रौप्य पदकावरुन भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे.

सुवर्णपदक विजेत्या बहारीन संघाचा एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने बहारीनच्या संघावर ही कारवाई करण्यात आली आहे. केमी अदेकोया या बहारीनचा खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला, ज्यामुळे Athletics Integrity Unit (AIU) ने बहारीनच्या संघावर कारवाई करत भारतीय संघाला सुवर्णपदक बहाल केलं आहे.

मोहम्मद अनस, एम.आर. पुवम्मा, हिमा दास, राजीव अरोकिया या भारतीय खेळाडूंनी ३:१५:७१ अशी वेळ नोंदवली होती. तर बहारीनच्या संघाने ३:११:८९ अशी वेळ नोंदवली होती. याव्यतिरीक्त महिलांच्या ४०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताच्या अनु राघवनलाही बढती देत कांस्यपदक बहाल करण्यात आलं आहे.

75 वर्षांत प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) भरणार :

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आयोजित केली जाणार आहे.

सत्रासाठी सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले भाषण संघटनेकडे पाठवतील, जे सभेदरम्यान चालवले जाणार आहेत. सभेला 21 सप्टेंबर 2020 पासून सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here