चालू घडामोडी | 24 फेब्रुवारी 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 24th february 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.

  • 23 फेब्रुवारी रोजी भारत सरकार, नागालँड सरकार आणि _____ या संस्थांनी 68 दशलक्ष डॉलर खर्च असलेल्या “नागालँडः एनहानसिंग क्लासरूम टिचिंग अँड रिसोर्सेस” प्रकल्पावर स्वाक्षरी केली – जागतिक बँक.
  • 23 आणि 24 फेब्रुवारी 2021 रोजी, ____ येथे फुले, भाज्या आणि फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते – वाराणसी, उत्तरप्रदेश.
  • उत्तरप्रदेश सरकार ___ याला आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून विकसित करेल – जेवार विमानतळ.
  • आंध्रप्रदेशचा ____ जिल्हा पंतप्रधान किसान राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडला गेला – अनंतपुरम.
  • केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे (CERC) नवीन सदस्य – श्री आर. के. सिंग (ऊर्जा राज्यमंत्री).
  • 22 फेब्रुवारी रोजी, राजनाथ सिंग यांनी _____ येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) अग्निसुरक्षा प्रशिक्षण-कौशल्य विकास केंद्राचे (SDC) उद्घाटन केले – पिलखुवा, उत्तरप्रदेश.
  • माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलेला राष्ट्रीय स्तरावरील नवीन चित्रपट पुरस्कार – ‘सत्यजित रे पुरस्कार’.
  • _____ आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) या संस्थांनी मत्स्यव्यवसाय व त्यासंबंधित क्षेत्राची निर्यात-केंद्रित मासेमारी आणि पालन करण्याच्या दृष्टीने त्यांचे विविध कार्यक्रम समक्रमित करण्यासाठी सामंजस्य करार केला – सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA).
  • ____ ही सार्वजनिक बँक सीमापार देयकांची सुविधा सुधारण्यासाठी जेपी मॉर्गन (अमेरिकेची कंपनी) याने विकसित केलेल्या ‘लिंक’ नामक नवीन ब्लॉकचेन तंत्रावर आधारित इंटरबँक डेटा नेटवर्कमध्ये सामील झाली – भारतीय स्टेट बँक.

Leave a Comment