चालू घडामोडी | 24 ऑगस्ट 2020

0
चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2020

महात्मा गांधीजींच्या चष्म्यांचा युकेमध्ये लिलाव :

इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये लिलाव झाला. या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (२,६०.००० पौंड) इतकी किंमत मिळली.

युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले.

रोमेश पठानिया यांना हॉकीसाठी जीवनगौरव गटात द्रोणाचार्य पुरस्कार :

रोमेश पठानिया यांना हॉकीसाठी जीवनगौरव गटात द्रोणाचार्य पुरस्कार दिला गेला. क्रिडा क्षेत्रातल्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी भारत सरकारच्यावतीने दरवर्षी क्रिडा पुरस्कार दिले जातात.

प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.

गणेश विलास लेनगारे यांचा स्टार 2020 पुरस्काराने सन्मान :

सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश विलास लेनगारे यांना लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ‘स्टार 2020’ प्रमाणपत्र देण्यात आले. कोविड-19 महामारीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी हा सन्मान त्यांना दिला गेला.

जॅक कॅलिस, झहीर अब्बास यांचा ICC Hall of Fame मध्ये समावेश :

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज झहीर अब्बास आणि जन्माने पुण्याची असलेली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांचा ICC च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आला आहे.

रविवारी ICC च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात तिन्ही दिग्गज खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला.

माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन :

माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे बुधवारी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गोपालस्वामी आयंगर कस्तुरीरंगन ही माजी क्रिकेटपटू आहेत. तामिळनाडूचे कस्तुरीरंगन यांनी रणजी करंडकात आपली कारकीर्द सुरू केली आणि 1962-63 या वर्षात प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष आणि BCCIच्या मैदान व खेळपट्टी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.

(Labour Bureau) श्रम विभागाचे अधिकृत बोधचिन्ह तयार :

श्रम व रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेल्या श्रम विभागाचे अधिकृत बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. दर्जेदार माहिती निर्माण करण्यासाठी अचूकता, वैधता आणि विश्वासार्हता आवश्यक असून या तीन उद्दिष्टांचे हे बोधचिन्ह प्रतिनिधित्व करते.

निळे चाक हे कॉग व्हील आहे जे कामांचे प्रतिनिधित्व करते, राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांशी जुळणारा तिरंगी आलेख आणि त्याच्याबरोबर ग्रामीण शेतीच्या श्रमाचे फळ दर्शविणाऱ्या गव्हाच्या ओंब्यां बोधचिन्हामध्ये सुंदर तऱ्हेने मांडण्यात आल्या आहेत.

Source: All India Radio, Livemint, Loksatta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here