चालू घडामोडी | 23 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 21 सप्टेंबर 2020 रोजी तुतीकोरिन (तामिळनाडू) आणि कोचीन (केरळ) या शहरांना माले (मालदीव) सोबत जोडणाऱ्या मालवाहू फेरी सेवेचा आरंभ भारताने केला.

2) भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच ‘ऑब्जर्वर’ म्हणून हेलिकॉप्टर तुकडीत दोन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. सब-लेफ्टिनंट कुमुदिनी त्यागी आणि सब-लेफ्टिनंट रिती सिंग असे या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत. युद्धनौकेवरुन चालविणाऱ्या हवाई लढाईत भाग घेणारी ही महिला योद्धाची पहिली तुकडी असणार.

3) संसदेने शेतकर्‍यांचे उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक, 2020 आणि शेतकर्‍यांचे (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि शेत सेवा विधेयक, 2020 मंजूर केले.

4) कोविड -19 साथीचा आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी मालदीव सरकारला अर्थसंकल्पित सहाय्य म्हणून भारताने 250 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत दिली आहे.

5) लोकसभेने राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ विधेयक 2020 मंजूर केले.

6) माजी संशोधन व विश्लेषण शाखा (R&AW) प्रमुख अनिल धस्माना यांची राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) ची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7) एव्हरेस्ट पर्वतारोहण करणारी पहिली व्यक्ती म्हणून दिग्गज नेपाळी शेर्पा मार्गदर्शक यांचे  दीर्घ आजाराने वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

कृषी उत्पादनांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळणाऱ्या विधेयकाला संसदेत मंजुरी :

कांदा, बटाटा, डाळी, तेलबिया, कडधान्ये आदी प्रमुख कृषी उत्पादनांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळणाऱ्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. त्यामुळे या विधेयकासह तिन्ही वादग्रस्त कृषी विधेयकांचे आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर कायद्यांमध्ये रूपांतर होईल.

सहा दशकांपूर्वी केलेल्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात प्रमुख कृषी उत्पादनांचा समावेश होता. आता या शेतमालांचे पुरेसे उत्पादन देशभरात होत असल्याने त्यांचा ‘जीवनावश्यक वस्तूं’च्या यादीत समावेश असण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने ५ जून रोजी वटहुकूम काढून या शेतमालांना यादीतून वगळले.

या कायद्यामुळे कांदा, बटाटा, डाळी, तेलबिया, कडधान्ये यांची साठवणूक व निर्यातीवरील निर्बंध शिथिल होतील. ही उत्पादने जीवनावश्यक मानली गेल्यामुळे त्यांच्या किमतीवर सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण होते. आता ही उत्पादने खासगी क्षेत्राला विकणे शेतकऱ्यांना शक्य होईल.

आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला :

जगात सर्वात जास्त सेवा केलेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला असून ती मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

भारतीय नौदलात 1987 मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून यावर्षी जुलैत 38.54 कोटी रुपयांना घेण्यात आली आहे.

आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती. 29 वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च 2017 मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली.

Leave a Reply