चालू घडामोडी | 23 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) अमेरिकेच्या ‘NASA’ या अंतराळ संशोधन संस्थेचे “स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स रिगोलिथ एक्स्प्लोरल (OSIRIS-REx)” नामक अंतराळयान ‘बेन्नू’ लघुग्रहावर यशस्वीरित्या उतरले.

2) रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार विजयवाडा विभागातील रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचा्यांनी विजयवाडा-हुबळी दरम्यान ट्रेन क्रमांक 07225 अमरावती एक्सप्रेसमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रम राबविला.

3) 21 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाला बाह्य अंतराळाचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्या शांततापूर्ण उद्देशांसाठी वापर करण्याबाबत सहकार्य करण्यासाठी भारत आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. जून, 2020 मध्ये बंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) आणि 13 ऑगस्ट 2020 रोजी अबुजा (नायजेरिया) येथे राष्ट्रीय अवकाश संशोधन व विकास संस्थेनी (NASRDA) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

4) रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) प्रोक्योरमेंट मॅन्युअल 2020 (PM-2020) ची नवीन आवृत्ती जारी केली.

5) ‘प्रोजेक्ट 28’ (कामोर्ता श्रेणी) अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या चार स्वदेशी पाणबुडी-रोधी युद्धनौकांपैकी शेवटची असलेल्या ‘कवरत्ती’ याचे 22 ऑक्टोबर 2020 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत जलावतरण झाले. ‘कवरत्ती’ युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने (DND) केली आहे आणि कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) यांनी त्याची बांधणी केली आहे.

6) अमेरिकेची नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी नोकिया कंपनीची निवड केली.

7) जागतिक आर्थिक मंच (WEF) या संस्थेनी “द फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट, 2020” प्रकाशित केला आहे. 2025 सालापर्यंत यांत्रिकीकरणामुळे जगभरात 85 दशलक्ष रोजगार नष्ट होणार आहे.

8) आर्थिक सहकार व विकास संघटनेच्या (OECD) ‘OECD इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक 2020’ अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत भारताचा द्वितीय क्रमांक आहे. अहवालानुसार 3.3 लक्ष लोकांनी स्थलांतर केले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दहा टक्के वाढ झाली. यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे.

जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार :

पुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे.

अभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते. ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.

काश्मिरी सफरचंदाच्या खरेदीकरिता बाजार हस्तक्षेप योजनेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी :

21 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू व काश्मीरमध्ये चालू हंगामासाठी म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सफरचंदांच्या खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या (MIS) विस्ताराला मंजुरी दिली आहे.

सफरचंद खरेदी राज्य नियुक्त संस्था अर्थात नियोजन व विपणन संचालनालय, फलोत्पादन विभाग आणि जम्मू व काश्मीर फलोत्पादन प्रक्रिया व विपणन महामंडळ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (NAFED) या केंद्रीय खरेदी संस्थेकडून केली जाणार आहे.

ही खरेदी थेट शेतकऱ्यांकडून केली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार पैसे जमा केले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 12 लक्ष मेट्रिक टन सफरचंद खरेदी केले जाणार आहे.

‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली:

‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल. हेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

19 ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राद्वारे 10 किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.

Leave a Comment