चालू घडामोडी | 23 फेब्रुवारी 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 23rd February 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.

 • ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
 • बुद्धिबळामधील पहिल्यावहिल्या ‘ग्लोबल चेस लीग’ची महत्त्वाची सूत्रे सोमवारी टेक महिंद्राने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदकडे सोपवली आहेत.
 • कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सार्वजनिक कंपनीने मालवाहतूकीसंबंधी देखरेख आणि माहिती सामायिक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या _____ सोबत करार केला – रेल्वे माहिती यंत्रणा केंद्र (CRIS).
 • 21 फेब्रुवारी 2021 रोजी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ____ या राज्यांमधील विविध रेल्वे स्थानकांवर 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या 88 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन व राष्ट्रार्पण झाले – केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक.
 • या राज्यातल्या संघटनांच्या पुढाकाराने 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत प्रथम ‘इंडिया टॉय फेअर’ आयोजित केला गेला आहे – मध्यप्रदेश.
 • ______ आणि दिल्लीच्या डीआयवायगुरु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण मंत्रालयाने ‘नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT 2.0)’ उपक्रमाचा आरंभ केला आहे, ज्याच्या अंतर्गत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख विजेरी वाहन नॅनोडीग्री कार्यक्रम प्रदान केले जाणार – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.
 • या संस्थेच्यावतीने 2 मार्च ते 4 मार्च 2021 या कालावधीत ‘मेरीटाईम इंडिया समिट’ या परिषदेची द्वितीय आवृत्ती आयोजित केली जाईल – बंदर, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय.
 • “फोकटेल्स ऑफ माओ, मराम आणि पौमाई” ही शीर्षक असलेले व्यंगचित्रकथा पुस्तक _______ जिल्ह्यात वस्ती असलेल्या “माओ, मराम आणि पौमाई” या तीन आदिवासी जमातींच्या लोककथांवर आधारित पहिले कॉमिक पुस्तक आहे – मणीपूरचा सेनापती जिल्हा.
 • केरळ सरकारच्यवतीने 2020 या वर्षासाठी देण्यात आलेल्या ‘स्वाती संगीत पुरस्कार’चे विजेता – के. ओमनाकुट्टी (कर्नाटकी गायक).
 • केरळ सरकारच्यवतीने 2020 या वर्षासाठी देण्यात आलेल्या ‘एस.एल. पुरम सदानंदन पुरस्कार’चे विजेता – इब्राहिम वेंगरा.
 • ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2021 (टेनिस)’ स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता – नोव्हाक जोकोविच.
 • द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ______ शहरात खेळवले जाणार आहेत – बेंगळुरू, कर्नाटक.
 • ‘इंडो-पाक पीस कॅलेंडर 2021’ नामक दिनदर्शिकेची 9 वी आवृत्ती ______ या संस्थेने प्रकाशित केली – आगाज-ए-दोस्ती (भारत-पाक मित्रता पुढाकार).

1 thought on “चालू घडामोडी | 23 फेब्रुवारी 2021”

Leave a Comment