चालू घडामोडी | 23 ऑगस्ट 2020

‘पिनाका’ अग्निबाणाची चाचणी यशस्वी :

दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय भुदलाच्या मदतीने भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) पोखरणच्या चाचणी क्षेत्रात स्वदेशी तयार केलेल्या मार्गदर्शित ‘पिनाका’ अग्निबाणाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (EEL) या खासगी कंपनीने पहिल्यांदाच ‘पिनाका’ अग्निबाण तयार केले आहे. ‘पिनाका’ हे 70 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदू शकणारे मार्गदर्शित अग्निबाण आहे. पिनाका अग्निबाण मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) मधून सोडण्यात येते. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्निबाण आहे.

भारत-संयुक्त अरब अमिराती संयुक्त आयोगाची 14 वी बैठक :

भारत-संयुक्त अरब अमिराती संयुक्त आयोगाची 14 वी बैठक अबू धाबी या शहरात होणार आहे. ही बैठक ऑगस्ट 2021 या महिन्यात होणार आहे. आयोगाची 13 वी बैठक ऑगस्ट 2020 या महिन्यात झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र कल्याण मंत्री शेख अब्दुल्ला बिन जाएद अल नाह्यान हे होते.

जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलारम यांना राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान :

केंद्र सरकारने 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील एकमेव शिक्षकाला हा सन्मान मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक नारायण मंगलारम यांना हा बहुमान देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यांच्या शिफारसीनुसार 153 शिक्षकांची निवड केली होती. त्यापैकी, 47 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकाचा समावेश आहे. देशात लॉकडाऊन असल्याने ही निवड पद्धती व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरणासाठी हलचाली :

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे. या यादीमध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या चार महत्वाच्या बँकाचा समावेश आहे.

या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. मात्र आता सरकारला समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे. मार्च २०२० मध्ये मंत्रीमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करुन सार्वजनिक क्षेत्रात चार बँका कार्यकरत राहण्यासंदर्भातील निर्णयाला मंजूरी दिली.

पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकचे विलीनीकरण झालं. तर कॅनरा बँकेने सिंडिकेट बँकचे विलनीकरण करुन घेतलं. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्परेशन बँकेचे विलीनीकरण झालं. तर इंडियन बँकेचे अलहाबाद बँकेत विलीनीकरण होणार आहे.

Leave a Comment