चालू घडामोडी | 22 सप्टेंबर 2020

0

वन लायनर चालू घडामोडी

1) तामिळनाडू हे सुरक्षित व नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणे अवलंबिणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे. त्यासाठी राज्य सरकारने सरकारी सेवेसाठी कार्यक्षम प्रणाली तयार करण्यासाठी वापरले जाणारे ‘नांबीक्काई इनाइयम’ (ब्लॉकचेन बॅकबोन) नामक व्यासपीठ तयार केले.

2) भारत आणि चीन यांच्यात मोल्डो येथे सीमेवरील स्टॉपऑफवर वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) चिनी बाजूला कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चा होणार आहे.

3) डब्ल्यूपीपी आणि कांतार यांनी जाहीर केलेल्या 2020 ब्रँडझेड टॉप 75 सर्वाधिक मूल्यवान भारतीय ब्रॅण्डिंगनुसार HDFC बँक सलग सातव्या वर्षासाठी 20.2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या ब्रँड व्हॅल्यूसह भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रँड ठरला.

4) भारतीय रेल्वे 16 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत “स्वच्छता पखवाडा” पाळत आहे.

5) पोषण अभियानाचा एक भाग म्हणून कुपोषण नियंत्रित करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

6) सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 2018-2025 साठी ड्रग डिमांड डिमांड रिडक्शन (NAPDDR) ची राष्ट्रीय कृती योजना तयार केली आणि अंमलात आणली आहे.

‘ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड’च्या न्यायाधीशपदी इंद्रजीत मोरे :

जागतिक दर्जाच्या नामांकित मानल्या जाणार्‍या ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड व विश्वविक्रम होणाऱ्या भारत सरकार व यु.एस ए मान्यताप्राप्त रेकॉर्डच्या सोलापूर जिल्हा मुख्य न्यायाधीश पदाचे कार्य इंद्रजीत मोरे यांच्या हाती आले आहे.

सांगोला तालुक्यातील इंद्रजीत मोरे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आहेत. त्याचबरोबर त्यांनी हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड , मार्वलस बुक ऑफ रेकॉर्ड , इंडिया रेकॉर्ड या जागतिक दर्जाच्या प्रमाणपत्रावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्डचे डायरेक्टर विश्वविक्रमवीर श्री नितीन गवळी सरांनी या कार्याचा आढावा घेऊन. ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड’चे सोलापूर जिल्हा न्यायाधीश सोपविले आहे.

संसदेत साथरोग विधेयकला मंजुरी :

संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झालं आहे. यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत.

सरकारकडून मागील बऱ्याच काळापासून ‘राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अधिनियम’ बनवण्याचं काम सुरु होतं, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्यांची मत जाणून घेण्याचा सल्ला कायदे विभागाने दिला होता.

“पहिल्या दोन वर्षांमध्ये आम्हाला केवळ चार राज्यांनी सल्ला दिला. यामध्ये मध्य प्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होता. आता आमच्याकडे एकूण १४ राज्यांनी दिलेले सल्ले आहेत,” असं सांगितलं.

भारताने मालदीवला केली 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत :

भारताच्या शेजारील देश मालदीवला सरकारने 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे. चीन मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहे. येथील परदेशी कर्जातील जवळपास 70 टक्के चीनचे कर्ज आहे.

मालदीव हिंद महासागरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मालदीवमधील चीनचे वर्चस्व कमी करणे भारतासाठी आवश्यक आहे.

भारताकडून आर्थिक मदतीची घोषणा मागील आठवड्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री शाहिद यांच्यामध्ये झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये करण्यात आली होती. हे कर्ज परत करण्यासाठी मालदीवकडे 10 वर्षांचा कालावधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here