चालू घडामोडी | 22 जून 2020

0

नव्या कल्पनांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोल इंडिया आणि अटल नवसंशोधन अभियान यांच्यात भागीदारी :

संपूर्ण देशभरामध्ये प्रमुख नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोल इंडिया लिमिटेडने (CIL) अटल नवसंशोधन अभियान (AIM) अंतर्गत नीति आयोगासोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल इंडिया लिमिटेड आणि अटल नवसंशोधन अभियान यांच्यामध्ये झालेल्या सहकार्याचा उद्देश या सर्व कार्यक्रमांना आणि नवनवीन कल्पनांच्या माध्यमांतून नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्र विकसित करणे, त्याचबरोबर अधिकाधिक जागरूकता निर्माण करून उद्योजकतेसाठी प्रेरणा देणे आहे.

या भागीदारीत अटल नवसंशोधन अभियानानुसार शालेय पातळीवर अटल टिंकरिंग लॅब, संस्थेच्या पातळीवर अटल इन्क्यूबेशन सेंटर, द्वितीय आणि तृतीय पातळीवरच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भारतामध्ये अटल समुदायिक नवसंशोधन केंद्र, उद्योगांच्या पातळीवर अटल नव भारत आव्हाने (ANIC), अॅप्लाइड रिसर्च अँड इनोव्हेशन (ARISE) आणि MSME उद्योग यासारख्या वेगवेगळ्या पातळीवर नवसंशोधनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्योजकता विकासाचे तंत्र निर्माण करण्यात येणार आहे.

सह्या झालेल्या आशयपत्रानुसार भागिदारी कार्यक्रमानुसार वर्गिकरण करण्यात आले आहे. यामध्ये अटल टिंकरिंग लॅबअंतर्गत CIL निवडक शाळांना दत्तक घेणार आहे. तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी मदत करणार आहे. ATLच्या विद्यार्थी वर्गाला सल्ला देवून त्यांना मदत करणार आहे.

याचप्रमाणे अटल समुदायिक नवसंशोधन केंद्र (ACIC) अंतर्गत CIL त्याच्या परिसरातल्या क्षेत्रामध्ये अटल समुदायिक नवसंशोधन केंद्रांना दत्तक घेवून त्यांना मदत करणार आहे. सामाजिक नवसंशोधन क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या युवांना मदत देणे आणि देशाच्या ज्या भागात विकास फारसा झालेला नाही, अशा क्षेत्रामध्ये नवसंकल्पनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

सेक्टर-५० नव्हे ‘she man’ स्टेशन; मेट्रो प्रशासनाकडून नामकरण :

तृतीयपंथीयांना समाजात सन्मानानं जगता यावं म्हणून शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहे. सामाजिक बदलाचा भाग म्हणून दिल्लीतील मेट्रो प्रशासनानं दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनचं नामकरण शी मॅन स्टेशन असं केलं आहे. या स्टेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

त्यांच्या विशेष सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नोएडा-ग्रेटर नोएडातील सेक्टर ५० मेट्रो स्थानकाचं नामकरण शी मॅन स्टेशन असं करण्यात आलं आहे. या निर्णयाविषयी बोलताना मेट्रोच्या व्यवस्थापक ऋतू माहेश्वरी म्हणाल्या की, “हे पाऊल नोएडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व तृतीयपंथी समुदायाच्या सहाय्यानं टाकण्यात आलं आहे.

लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन:

रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचं रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. राजेंद्र गोयल 77 वर्षांचे होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक 637 बळी टिपले.

तर इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप 600 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. गोयल यांनी रणजी क्रिकेट गाजवले, पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात 25 पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा 15 वेळा केला. तसेच  हरयाणाच्या गोयल यांनी 157 सामने खेळले.

तर 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी 59 वेळा एका डावात 5 बळी तर 18 वेळा एका सामन्यात 10 बळी टिपण्याची किमया साधली. त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत 1,037 धावाही केल्या. ते पतियाळा, पंजाब आणि दिल्ली या संघांकडून क्रिकेट खेळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here