चालू घडामोडी | 22 जुलै 2020

‘मनोदर्पण’: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम :

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते 21 जुलै 2020 रोजी ‘मनोदर्पण’ या उपक्रमाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. हा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम आहे.

ठळक बाबी

  • कोविड-19 महामारीच्या काळात अध्ययनाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे.
  • या मुद्याची दाखल घेत मंत्रालयाने विद्यार्थ्यांना महामारीच्या काळात आणि त्यानंतर त्यांचे मानसिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मानसिक व सामाजिक पाठबळ देणारा हा उपक्रम हाती घेतला आहे.
  • कोविड-19 च्या उद्रेकाच्या पश्चात भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 12 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात केली.
  • मानवी भांडवल बळकट करण्याचा आणि उत्पादकता वाढवण्याचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी सुधारणा व उपक्रम राबवण्याचा एक भाग म्हणून आत्मनिर्भर भारत अभियानात ‘मनोदर्पण’ उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
  • निरोगी जीवनशैली कायम राखण्यासाठी देशभरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि तणावमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील करण्यात आले.

भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित-भारत ड्रोन प्रदान

संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित-भारत ड्रोन प्रदान केले आहे. हे ड्रोन सैन्याला उच्च उंच भागात आणि डोंगराळ प्रदेशात अचूक पाळत ठेवण्यात मदत करतील, विशेषत: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर.

चंदिगडस्थित संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या प्रयोगशाळेत भारत ड्रोन विकसित केले गेले आहेत. ड्रोनची मालिका जगातील सर्वात चपळ आणि सर्वात हलके पाळत ठेवणार्‍या ड्रोनमध्ये सूचीबद्ध केली जाऊ शकते.

हा छोटा परंतु शक्तिशाली ड्रोन कोणत्याही स्थानावर अचूकतेसह स्वायत्तपणे कार्य करू शकतो. मित्र आणि शत्रूंचा शोध घेण्यासाठी हे आळशी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज आहे आणि त्यानुसार कारवाई करू शकते. हे अत्यंत थंड हवामान तापमानात टिकून राहण्यास सक्षम बनविण्यात आले आहे आणि कठोर हवामानासाठी हे आणखी विकसित केले गेले आहे.

सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला:

ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे.

त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते. सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त 30 मिनिट लागली. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली.

भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार:

भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत.

P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी 2021 वाटाघाटी सुरु होऊ शकतात.

भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान असून P-8I मधला I खास भारतासाठी आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक 2 मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते.

रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक- सेरी-ए फुटबॉल स्पर्धा :

अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला 2-1 नमवले. रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.

या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. रोनाल्डोने 51व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर 54व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

Leave a Reply