चालू घडामोडी | 22 फेब्रुवारी 2021

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याच्या घोषणेनुसार, भारताचे ‘चंद्रयान-3’ मोहीम ____ मध्ये पाठवली जाणार – वर्ष 2022.
 • ____ संस्थेच्या संशोधकांनी चुंबकीय क्षेत्राच्या कार्यप्रणाली अंतर्गत थेंबांचे जलद बाष्पीभवन करण्यासाठीची एक नवीन पद्धत विकसित केली आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), गुवाहाटी.
 • द आर्बर डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) हैदराबादला ‘2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली आहे. शहरी वनांच्या संवर्धनासाठी शहराच्या बांधिलकी लक्षात घेता ही मान्यता देण्यात आली आहे. असा दर्जा मिळविणारे हैदराबाद हे देशातील एकमेव शहर आहे.
 • अटल पर्यावरण भवन – लक्षद्वीप वनविभागाचे मुख्यालय.
 • केंद्रीय सरकारने ______ मधील औद्योगिक विकासासाठी एकूण 28400 कोटी रुपयांची नवीन केंद्रपुरस्कृत योजना जाहीर केली असून ती 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2037 पर्यंतच्या कालावधीत लागू होईल – जम्मू व काश्मिर.
 • 21 फेब्रुवारी 2021 रोजी ____ येथे ‘लडाख हिवाळी परिषद’ याची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली – लेह.
 • या राज्य सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याची घोषणा केली – आसाम.
 • 21 फेब्रुवारी 2021 रोजी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ____ येथे ‘श्री गुरु रविदास विश्व महापीठ राष्ट्रीय अधिवेशन’चे उद्घाटन केले – नवी दिल्ली.
 • _____ संस्थेने त्याच्या परिसरात ड्रोन विषयक संशोधनासाठी एका अत्याधुनिक केंद्राची स्थापना केली – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुडकी.
 • भारत आणि ____ या देशांच्या सरकारांनी 20 फेब्रुवारी 2021 रोजी मत्स्य प्रक्रिया, सार्वजनिक प्रसारण, शाश्वत शहरी विकास, रस्ते पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी करार केलेत – मालदीव.
 • इतिहासात प्रथमच, _____ देशात एव्हियन फ्लूचा H5N8 स्ट्रेन मानवांमध्ये संक्रमित झाल्याची पहिली घटना आढळली – रशिया.
 • 19 फेब्रुवारी 2021 रोजी _____ देश अधिकृतपणे 2015 पॅरिस करारामध्ये पुन्हा सामील झाला – अमेरिका.
 • 21 फेब्रुवारी 2021 रोजी, ____ देशाची सागरी क्षमता वाढविण्यासाठी भारताने 50 दशलक्ष डॉलरच्या संरक्षण पतमर्यादा करारावर स्वाक्षरी केली – मालदीव.
 • भारतीय स्टेट बँकेची एक सहाय्यक कंपनी, जी ‘योनो मर्चंट’ नावाचे एक मोबाइल अॅप बाजारात आणणार आहे जे छोट्या व्यापाऱ्यांना कमी किमतीत डिजिटल देयकाची पायाभूत सुविधा प्रदान करणार – SBI पेमेंट्स.
 • स्टार्टअप आणि MSME उद्योगांसाठी पतपुरवठा करण्याची सुविधा वाढविण्यासाठी _____ आणि IISc बेंगळुरूच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट (SID) या पुढाकारासह एक सामंजस्य करार केला – इंडियन बँक.
 • मल्याळम भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘महाकवी कुंचन नंबियार पुरस्कार 2021’चे विजेता – प्रभा वर्मा (कवी).

1 thought on “चालू घडामोडी | 22 फेब्रुवारी 2021”

Leave a Comment