चालू घडामोडी | 22 ऑगस्ट 2020

रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ :

20 ऑगस्‍ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्रायफेड संस्थेच्या “ट्रायफूड प्रकल्प”च्या प्रक्रिया केंद्रांचा आभासी शुभारंभ करण्यात आला.

ट्रायफूड प्रकल्पाचा उद्देश दोन्ही घटकांना त्याच्या इच्छित गुणवत्तेत रूपांतरित करणे हा आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड संस्थेकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून आदिवासीं वन मजुरांनी गोळा केलेल्या वन्य उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन आणि योग्य वापराद्वारे आदिवासींचे उत्पन्न वाढवणे हे ट्रायफूड प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे सलग तीन विजय :

भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.

भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला 6-0 असे सहज हरवले. मग व्हिएतनामवर 4-2 असा आणि उझबेकिस्तानवर 5.5-0.5 असा विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

Leave a Comment