चालू घडामोडी | 21 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो.

2) मार्गारेट अॅटवुड या ‘रिचर्ड सी. होल्ब्रूक डिस्टिंगूइश्ड अचिव्हमेंट अवॉर्ड 2020’ (ज्याला डेटन साहित्यिक शांती पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते) या पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.

3) 2 ऑक्टोबर 2020 रोजी ‘वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव / VAIBHAV) शिखर परिषद’ आयोजित केली जाणार आहे. हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा कार्यक्रम आहे, ज्यामार्फत जगभरातल्या भारतीय तज्ज्ञांना प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

4) दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी ‘अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन’ या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.

5) आंतरराष्ट्रीय फायनान्स कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, हरित इमारती विकसित करण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांचा विस्तार करण्यासाठी दोन ट्रिलियन डॉलर्स भारताला पुरविले जातील.

6) प्रथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत – शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार). ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.

7) ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या हिंदू कुश क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश भयानक दराने वितळत आहे. असे आढळले आहे की अश्या घटनेचा आता या प्रदेशातल्या पृष्ठभागावरील आणि भूजल उपलब्धतेवर परिणाम होत आहे.

8) कर्नाटक विकास ग्रामीण बँक (KVGB) ने 7.25% व्याजदरासह कमी केलेली ‘विकास लाघू सुवर्णा’ ही विशेष सोन्याची कर्ज योजना सुरू केली आहे.

महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला; सिलेक्‍शन कमिशन नेमण्यात आले

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांना लष्करातील वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता यासाठी लष्करातर्फे निवड आयोग म्हणजेच सिलेक्‍शन कमिशन नेमण्यात आले असून, दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात या आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

लष्करी सेवेत महिलांना परमनंट कमिशन म्हणजेच कायमस्वरूपी पदावर नियुक्ती मिळावी, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे महिलांना कर्नल रॅंकपेक्षा वरिष्ठ रॅंकवर नियुक्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच यामुळे लष्करी प्रशिक्षण, संशोधन आणि कार्यालयीन आस्थापनांच्या प्रमुखपदी नियुक्ती मिळणार आहे.

मात्र, यासाठी महिला व पुरूष दोन्ही अधिकाऱ्यांची निवड ही सिलेक्‍शन कमिशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानुसार महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लष्कर प्रशासनातर्फे या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ब्रिगेडियर रॅंकच्या महिला अधिकारी या आयोगात निरीक्षक म्हणून काम पाहतील. यामुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता राहील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.

तीन कामगार संहिता चर्चेसाठी लोकसभेत सादर केल्या :

कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी लोकसभेत तीन कामगार संहिता सादर केल्या आहेत. ही विधेयके पुढीलप्रमाणे आहेत – औद्योगिक संबंध संहिता 2020; व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळी परिस्थिति विधेयक 2020; सामाजिक सुरक्षा संहिता 2020 संघटित किंवा असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांना किमान वेतन आणि वेळेवर वेतन देण्याचा वैधानिक हक्क तयार केला गेला आहे.

देशातल्या सर्व कामगारांना किमान मजुरीच्या हक्कांची यात तरतूद आहे. संपूर्ण सेवा क्षेत्रामध्ये (माहिती तंत्रज्ञान, आतिथ्य, वाहतूक इ.), देशातले कामगार, असंघटित कामगार, शिक्षक यांनाही हा कायदा लागू होणार.

1 thought on “चालू घडामोडी | 21 सप्टेंबर 2020”

Leave a Comment