चालू घडामोडी | 21 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) डिजिटल इनोव्हेशनद्वारे सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, नीति आयोग यांनी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, एडब्ल्यूएस सह फ्रंटियर टेक्नॉलॉजीज क्लाउड इनोव्हेशन सेंटर, सीआयसीची स्थापना करण्याची घोषणा केली.

2) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याच्या केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CMERI) या संस्थेनी घनकचरा प्रक्रिया सुविधा विकसित केली आहे.

3) IIT दिल्लीचे डॉ भीम सिंग आणि संयुक्त अरब अमिराती देशाच्या डॉ. आऐषा अलनुईमी यांना आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) यांच्यावतीने प्रथम कल्पना चावला पुरस्कार देण्यात आला.

4) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी आसाममधील भारतातील पहिल्याच बहु-मॉडेल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी केली.

5) 1 नोव्हेंबर 2020 पासून ‘फूड सेफ्टी कॉमप्लीअन्स सिस्टम’ (FosCoS) प्रणाली ‘फूड लायसेंसिंग अँड रजिस्ट्रेशन सिस्टम’ याची जागा घेणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी याविषयी घोषणा केली.

6) एशियन डेव्हलपमेंट बँक, एडीबी आणि भारत सरकार यांनी महाराष्ट्रातील राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते 450 किलोमीटर वाढविण्यासाठी 177 दशलक्ष डॉलर्स कर्जावर स्वाक्षरी केली.

देशी बनावटीचे स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्र :

संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राविषयी

  • भारतीय हवाई दलासाठी (IAF) DRDO संस्थेनी विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.
  • हवेतून पृष्ठभागावर मारा केले जाणारे क्षेपणास्त्र आहे.
  • SANT क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरद्वारे सोडल्या जाणाऱ्या ‘नाग (हेलीना)’ या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आहे.
  • ‘लॉक-ऑन बिफोर लॉंच’ आणि ‘लॉक-ऑन आफ्टर लॉंच’ अश्या दोनही पद्धतीने मार्गदर्शित केले जाऊ शकते.

जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे.

सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे.

सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.

Leave a Comment