चालू घडामोडी | 21 जून 2020

0

‘सत्यभामा’: खनिकर्म क्षेत्रात प्रगतीसाठी संशोधन व विकास संदर्भात नवे व्यासपीठ

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते दिनांक 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘सत्यभामा’ (खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना उर्फ SATYABHAMA) या संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला.

जोशी यांनी खाण व खनिज क्षेत्रातील वैज्ञानिक आणि संशोधकांना आत्मनिर्भर भारतासाठी गुणात्मक व नाविन्यपूर्ण संशोधन व विकास कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक बाबी : राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) आणि खाण माहिती विभागाद्वारे व्यासपीठाची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आली आहे. हे व्यासपीठ प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच वैज्ञानिक / संशोधकांकडून सादर केलेले संशोधनाचे प्रस्ताव आणि त्यासाठी दिलेला निधी/अनुदान वापरण्यास परवानगी देते. संशोधक यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवाल देखील सादर करू शकतात.

जनहितासाठी लागू केलेल्या भू-शास्त्र, खनिज अन्वेषण, खाण आणि संबंधित क्षेत्र, खनिज प्रक्रिया, इष्टतम उपयोग आणि देशाच्या खनिज स्त्रोतांच्या संवर्धनासाठी संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने खाण मंत्रालयाच्या विज्ञान व तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेच्या अंतर्गत संशोधन व विकास प्रकल्प राबविण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व औद्योगिक संशोधन विभागासह मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, राष्ट्रीय संस्था आणि संशोधन व विकास संस्थांना भारत सरकारचे खाण मंत्रालय निधी प्रदान करते. व्यासपीठामुळे योजनेच्या अंमलबजावणीची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज :

गलवान खोऱ्यातील वाद शिगेला पोहोचला असताना भारतीय संरक्षण क्षेत्रात लढाऊ विमान बनविण्यात अग्रणी असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सुद्धा भारताच्या संरक्षणासाठी मैदानात उतरली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे.

भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव पाहता युद्धजन्य परिस्थितीत ‘सुखोई 30’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरी ताकद सिद्ध करणार आहे. तर त्यामुळेच एच.ए.एल.ला देखील अप्रत्यक्षिरत्या हायअलर्टवर आल्याचे सांगितले जात आहे.

देशभरात आज जितकी एअरफोर्स केंद्र आहेत तेथे असलेल्या लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्याचे धोरण लवकरच अवलंबून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाणार आहेत.

स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटींची योजना :

करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे आपआपल्या राज्यांमध्ये परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.

बिहारच्या खगडिया जिल्ह्य़ातील एका खेडय़ात दूरसंवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार योजनेचे उद्घाटन केले. तर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री या वेळी उपस्थित होते.

तसेच ही योजना ग्रामीण विकास, पंचायती राज, रस्ते वाहतूक व महामार्ग, खाणी, पेयजल व स्वच्छता, पर्यावरण, रेल्वे, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, अक्षय ऊर्जा, सीमा रस्ते, दूरसंचार व कृषी अशा वेगवेगळ्या 12 मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारणार आहे. ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ ही योजना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांच्या 116 जिल्ह्य़ांमधील 25 हजार मजुरांसाठी 125 दिवस राबवली जाईल.

IIT गुवाहाटीच्या संशोधकांकडून कोविड-19 च्या निदानासाठी स्वस्त टेस्ट किट विकसित

कोविड-18 विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी आर.आर. अ‍ॅनिमल हेल्थकेअर लिमिटेड आणि गुवाहाटी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) इथल्या संशोधकांनी स्वस्त अश्या तीन वेगवेगळ्या टेस्ट किट (म्हणजेच तपासणी संच) विकसित केल्या आहेत; त्यामध्ये व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (VTM) किट, RT-PCR किट आणि RNA आयसोलेशन किटचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here