चालू घडामोडी | 21 जुलै 2020

PPE संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी NABL संस्थेकडून CIPET संस्थेला मान्यता :

रसायने व खते मंत्रालयाचे रसायन व पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या अखत्यारीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) या संस्थेला वैयक्तिक सुरक्षात्मक उपकरणे (PPE) संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणसाठी राष्ट्रीय चाचणी व अंशशोधण प्रयोगशाळा मान्यता मंडळाची (NABL) मान्यता प्राप्त झाली आहे.

PPE संचात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हातमोजे, घालावायचा परिधान, फेस शिल्ड, गॉगल आणि ट्रिपल-लेयर मेडिकल फेस मास्क इत्यादींचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार CIPET आरोग्यसेवा क्षेत्रात संशोधन आणि विकास उपक्रम राबवत आहे.

संयुक्तअरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप :

संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.

‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान १.३ टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५८ वाजता सोडण्यात आले. यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत.

त्याच्या सौरपट्टय़ा उघडण्यात आल्या असून मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रक्षेपण सेवेने यान प्रक्षेपित केले आहे. सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान ४९ कोटी ५० लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे. २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे.

या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते. हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन :

निधन मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. 1978–84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते.

तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.

Leave a Reply