चालू घडामोडी | 20 सप्टेंबर 2020

0

वन लायनर चालू घडामोडी

1) मार्च 2024 च्या अखेरीस पंतप्रधान भारतीय जनता जनसिद्धी केंद्रे, PMBJKची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

2) ऑक्टोबर 2020 मध्ये नियोजित असलेल्या संयुक्त राज्ये अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या 2 + 2 मंत्री बैठकीत दोन्ही देशांमध्ये ‘भू-स्थानिक सहकार्यासाठी मूलभूत विनिमय आणि सहकार्य करार’ (BECA) हा करार होणार आहे. या करारामुळे अमेरिकाने तयार केलेली संरक्षण उपकरणे आणि क्षेपणास्त्रांविषयीची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेची माहिती भारतासाठी उपलब्ध होणार.

3) ‘INS विराट’ नामक भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजाने 18 सप्टेंबर रोजी मुंबईहून गुजरातकडे त्याचा शेवटचा प्रवास सुरू केला. ते जहाज 30 वर्षांच्या सेवेनंतर 2017 साली निवृत्त करण्यात आले आहे.

4) ई-कॉमर्स दिग्गज अॅनमेझॉन इंडियाने गुजरातमधील काडी येथे एक पूर्ण महिला कामदार पुरवठा केंद्र सुरू केले आहे, जे भारतातील दुसरे असे केंद्र आहे.

5) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे तर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोने नुकत्याच झालेल्या श्वेत बॉल मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी बजावल्यानंतर पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले.

6) भारत सरकारच्या अंतराळ विभागाकडून ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ उन्नती व अधिकृत मंजूरी केंद्र’ तयार करण्यात आले आहे. ही संस्था एक स्वतंत्र मध्यवर्ती संस्था आहे, जी खासगी कंपन्यांच्या अंतराळ तंत्रज्ञानाविषयी भारतातल्या कार्यांना परवानगी देते तसेच त्यावर नियंत्रण ठेवते.

7) संयुक्त राष्ट्रसंघाने उदित सिंघल (वयवर्ष 18) याची शाश्वत विकास ध्येयांसाठीच्या (SDG) ‘2020 क्लास ऑफ 17 यंग लीडर्स’ या गटामध्ये निवड केली आहे. जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. उदित सिंघल हा ‘ग्लास2सँड’ प्रकल्पाचा संस्थापक आहे, ज्याच्या माध्यमातून दिल्लीतल्या काचेच्या कचर्याडची समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहे.

‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना NTRO चे नवीन चीफ :

रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ चे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपग्रह फोटो आणि टेक्निकल इंटेलिजन्सची जबाबदारी NTRO वर आहे. धस्माना आयबीचे माजी अधिकारी सतीश झा यांची जागा घेतील. अनिल धस्माना १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

ते पाकिस्तानच्या विषयातील तज्ज्ञ असून मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्याच्या आखणीमध्ये धस्माना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धस्माना पुढची दोनवर्ष NTRO च्या प्रमुखपदी असणार आहेत. मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असणारे अनिल धस्माना यांनी १९९३ साली ‘रॉ’ मध्ये काम सुरु केले. ‘रॉ’ कडे भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी आहे.

‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले :

प्रथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत –

शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार)

‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here