चालू घडामोडी | 20 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) ऐश्वर्या श्रीधर ही लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्यूजियम यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’ पुरस्काराची प्रथम भारतीय विजेता ठरली आहे.

2) भारतीय नौदल आणि श्रीलंकी नौदल यांच्यादरम्यानची ‘SLINEX-20’ नामक आठवी द्विपक्षीय सागरी कवायत 19 ते 21 ऑक्टोबर 2020 या काळात आयोजित करण्यात आली. श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे ही कवायत चालणार आहे.

3) युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय यांची सन २०२० -२१ मध्ये भारतीय बैंक संघ (Indian Banks’ Association) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

4) बांगलादेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या वर्षी 26 मार्च रोजी देशाच्या स्वातंत्र्याच्या 50 वर्षांच्या उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

5) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जागतिक बँक विकास समितीच्या पूर्ण बैठकीच्या 102 व्या बैठकीत भाग घेतला.

हवाई दलाच्या MI-35 हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

भारतीय हवाई दलाच्या एमआय-३५ हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली.

SANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.

७ ते ८ किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज १५ ते २० किमी आहे. भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स (AAC) यांची एकत्रितरित्या ४,००० SANT क्षेपणास्त्राची गरज आहे.

सन २०२१ च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे. एएलएच रुद्र एमके ४ आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी SANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.

नासा आणि नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आखताय योजना :

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी योजना आखत आहेत.

नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.

या प्रकल्पासाठी १४.१ मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची ‘आयुष्मान सहकार’ योजना :

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) यांच्यावतीने ‘आयुष्मान सहकार’ योजना सादर करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सहकारी संस्थांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही योजना आहे.

योजनेसाठी सुमारे 10,000 कोटी रुपये एवढा निधी वाटप करण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) ही सहकार क्षेत्रातली एक प्रमुख आहे आणि एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1963 साली संसदेच्या अधिनियमान्वये भारत सरकारने केली.

सहकार तत्वावर उत्पादन, प्रक्रिया, बाजार, साठा, निर्यात व आयात, कृषी उत्पन्न, अन्नधान्य, औद्योगिक वस्तू, पशुपालन, अन्य काही वस्तू व सेवा जसे की रुग्णालय व आरोग्य सेवा व शिक्षण इत्यादींविषयीच्या कार्यक्रमांची योजना तयार करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment