चालू घडामोडी | 20 फेब्रुवारी 2021

 • जगभरातल्या देशांमध्ये आणि परस्परात शांतता व समृद्धीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकरिता ‘सामाजिक न्याय’ म्हणून एक मूल्य जगात आहे. हे मूल्य जपण्याच्या उद्देशाने जगभरात दरवर्षी 20 फेब्रुवारी या दिवशी “जागतिक सामाजिक न्याय दिन” पाळला जातो.
 • जागतिक सामाजिक न्याय दिन 2021 (20 फेब्रुवारी) याची संकल्पना – “ए कॉल फॉर सोशल जस्टिस इन द डिजिटल इकॉनॉमी”.
 • 17 फेब्रुवारी रोजी या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली – महाराष्ट्र (मुंबईमध्ये).
 • हे राज्य सरकार नागरिकांना घरीच आयुर्वेदिक वैद्यांची सेवा मार्च 2021 पर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ‘वैद्य आपके द्वार’ नावाची एक नवीन योजना लागू करणार आहे – मध्यप्रदेश.
 • विजेवर चालणारी वाहने, अश्या वाहनांसाठी चार्जिंगची पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी 19 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू करण्यात आलेली मोहीम – ‘गो इलेक्ट्रिक’ (ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीद्वारे राबविण्यात येत आहे).
 • ‘______’ अभियान अंतर्गत देशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात दोन फेऱ्यात लसीकरणाचा कार्यक्रम होणार असून, पहिली फेरी 15 दिवसांसाठी 22 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होणार आणि दुसरी फेरी 22 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे – ‘सघन मिशन इंद्रधनुष (IMI) 3.0’.
 • भारतातील पहिले पामपर्ण-हस्तलिखित संग्रहालय _____ शहरात स्थापन करण्यात आले – तिरुवनंतपुरम, केरळ.
 • असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) या संस्थेच्यावतीने 18 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या ‘राष्ट्रीय शिक्षण शिखर परिषद 2021’ याची संकल्पना – “NEP: ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशनल लँडस्केप ऑफ द नेशन्स अँड कारव्हिंग ए रोड मॅप फॉर इम्प्लिमेंटेशन”.
 • ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2021 (टेनिस)’ स्पर्धेच्या मिश्र महिला दुहेरी गटाची विजेता जोडी – एलिस मर्टेन्स (बेल्जियम) आणि एरिना सबलेन्का (बेलारूस).
 • भारताची अंकिता रैना आणि रशियाची कमिला राखिमोव्हा या जोडीने मेलबर्न शहरात खेळवल्या गेलेल्या ‘फिलिप आयलँड ट्रॉफी 2021’ स्पर्धेच्या मिश्र महिला दुहेरी गटाची स्पर्धा जिंकली.
 • पुरुष संघाच्या ताज्या FIFA क्रमवारीत, जगात भारतीय संघाचा क्रमांक – 104 वा (आशियात 19 वा).
 • पुरुष संघाच्या ताज्या FIFA क्रमवारीत, जगात प्रथम क्रमांक – बेल्जियम (त्यानंतर फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड, पोर्तुगाल आणि स्पेन).
 • संयुक्त राष्ट्र संघ अन्न व कृषी संघटना (UN FAO) आणि आर्बोर डे फाउंडेशन या संस्थेने शहरी जंगलांची वाढ आणि देखरेख करण्याच्या वचनबद्धतेसाठी ______ शहराला ‘2020 ट्री सिटी ऑफ वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली – हैदराबाद.

Leave a Comment