चालू घडामोडी | 20 ऑगस्ट 2020

National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल- मोदी सरकार :

सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.

दिल्ली पोलीसांच्या निवासी वसाहतींमध्ये आयुर्वेदीक आरोग्य सेवा वाढविण्यासाठी ‘धन्वंतरी रथ’ तैनात :

‘आयुरक्षा’ उपक्रमाच्या अंतर्गत दिल्ली पोलीसांच्या निवासी वसाहतींमध्ये आयुर्वेदीक सेवांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘आयुर्वेद प्रतिबंधक व प्रोत्साहनपर आरोग्य सेवा’ यांचा विस्तार करण्यासंबंधी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि दिल्ली पोलीस यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.

या सेवा ‘धन्वंतरी रथ’ हे फिरते वाहन आणि पोलीस कल्याणकारी केंद्र यांच्यामार्फत पुरविल्या जात आहेत. ‘आयुरक्षा’ हा अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि दिल्ली पोलीस यांचा एक संयुक्त उपक्रम आहे, ज्यामार्फत आयुर्वेदीक औषधोपचारांचा वापर करून कोविड-19 महामारीच्या काळात सर्वात पुढे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर :

कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे. रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरीता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरीता दोन ‘निन्जा’ मानव-रहीत हवाई वाहनांची खरेदी केली आहे. वास्तविक वेळेत शोध, चलचित्रपट तयार करण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.

रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे RPF दलाने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लक्ष रुपये खर्चून दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत. तसेच 97.52 लक्ष रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment