चालू घडामोडी | 02 सप्टेंबर 2020

0

चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक :

श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

सन 1996 च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.

राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त

भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला. राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.

अशोक लवासा यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.

भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

देशातली पहिली बंगळुरू-सोलापूर ‘रो-रो’ रेल्वेसेवा कार्यरत :

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या “रोल ऑन रोल ऑफ’ (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

रेल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असणार. चालक आणि एक व्यक्ती ट्रकसोबत प्रवास करू शकते. एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असणार.

वन लायनर चालू घडामोडी

  • भारतीय रेल्वेने “मेडबॉट” नामक स्वयंचलित वैद्यकीय ट्रॉली तयार केली आहे, ज्याद्वारे कोविड-19 रुग्णांना अन्न आणि औषधे पुरवण्यात मदत होते.
  • लेबनीज राष्ट्रपति मिशेल आऊन यांनी मुस्तफा अदिब यांना प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविल्यानंतर त्यांची लेबेनॉन देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली.
  • नुकतीच मुस्तफा अदिब यांची लेबेनॉन देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली.
  • हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळाला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  • हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतीय उद्योग संघ (CII)-गोदरेज ग्रीन बिझिनेस सेंटर (GBC) या संस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या ‘नॅशनल एनर्जी लीडर’ आणि ‘एक्सेलेंट एनर्जी इफिशिएंट युनिट’ या पुरस्कारांचा मानकरी ठरला.
  • वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या दुर्गापूर येथील केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्थेनी (CSIR-CMERI) जगातला सर्वात मोठा सौर वृक्ष तयार केला आहे, ज्याची ऊर्जा निर्मिती क्षमता 11.5 किलोवॅट एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here