चालू घडामोडी | 2 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) ‘VIRAL (व्हिनस इन्फ्रारेड अॅटमॉसफियरीक गॅसेस लिंकर) इन्स्ट्रुमेंट’ (किंवा शुक्रयान 1) ही 2025 साली पाठवली जाणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची शुक्र मोहीम आहे. VIRAL इन्स्ट्रुमेंटच्या विकासात रशियाची रोसकॉसमॉस अंतराळ संस्था आणि LATMOS प्रयोगशाळा (फ्रान्स) हे भारताचे सह-भागीदार आहेत. शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी यान पाठविण्यात येणार.

2) 30 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी सार्वजनिक क्षेत्रातल्या 6 बँकांना RBI कायद्याच्या अनुसूची-II मधून वगळले. इतर बँकांमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर हे असे केले गेले. त्या सहा बँका म्हणजे – सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, अलाहाबाद बँक. अनुसूचित वाणिज्य बँक होण्यासाठी बँकेला 5 लक्ष रुपये (किमान) दत्त भांडवल (paid-up capital) धारक असावा लागतो.

3) कोलकाता शहराजवळ भारतीय तटरक्षक दलाचे ‘ICGS कनकलता बरुआ’ हे गतिमान गस्त जहाज तैनात करण्यात आले आहे. ते भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात आलेले पाचवे गतिमान गस्त जहाज (FPV) आहे.

4) ‘रशीद’ हे 2024 साली संयुक्त अरब अमिराती या देशाकडून चंद्रावर पाठविण्यात येणाऱ्या अंतराळयानाचे नाव आहे.

5) यावर्षी नोव्हेंबरपर्यंत चीन जगातील पहिला उत्खनन रोबोट अवकाशात पाठवेल.

6) जलसंकल्पात डेन्मार्कबरोबर गुजरात सरकारने सामंजस्य करार केला आहे.

7) केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सीएसआयआर-निस्टाड्स चाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण विकासासाठी सीएसआयआर टेक्नॉलॉजीज सुरू केले.

8) केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गहलोत यांनी एससींसाठी व्हेंचर कॅपिटल फंड अंतर्गत आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन (ASIIM) चे ई-लॉन्चिंग केले.

अटल बोगदा: महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे 3 ऑक्टोबर 2020 रोजी अटल बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. तो 9.02 किलोमीटर लांबीचा महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा आहे. आठ मीटर रूंदीचा दुपदरी मार्ग त्यामध्ये तयार केला गेला आहे.

बोगद्याची उंची 5.525 मीटर ठेवण्यात आली आहे. बोगद्याची एकूण रूंदी 10.5 मीटर असून त्यामध्ये 3.6 गुणिले 2.25 मीटरचा आपत्तीकाळासाठी अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आला आहे.

हा बोगदा मनाली ते लाहौल-स्पिती या शहरांना जोडतो. हिमालयी पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून 3000 मिटर (10,000 फूट) उंचीवर असलेल्या पिर पंजाल येथे हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह या शहरांमधले 46 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.

चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर निधन झाले :

मुलांसाठी असलेल्या ‘चांदोबा’ मासिकातील विक्रम आणि वेताळच्या चित्रांसाठी ओळखले जाणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे बुधवारी चेन्नईत निधन झाले. ते 97वर्षांचे होते.

मूळचे तेलुगु नियतकालिक असलेल्या ‘चंदामामा’ मासिकाची स्थापना चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी व चक्रपाणी यांनी 1947 साली केली होती.

मुलांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभल्याने हे मासिक नंतर 13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. या प्रकाशनाच्या मूळ डिझायनर चमूतील शिवशंकर हे अखेरचे सदस्य होते.

Leave a Comment