चालू घडामोडी | 02 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) पंतप्रधान मोदींनी केवडिया येथे वॉटर एरोड्रोम आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटशी जोडणारी सी-प्लेन सर्व्हिसचे उद्घाटन केले.

2) वाढत्या पर्यटनाच्या दृष्टीने, पूर्वोत्तर प्रदेशाचे केंद्रीय विकासमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीर मधील मानसर तलाव विकास योजनेचे उद्घाटन केले.

3) अमेरिकेच्या बोस्टनमध्ये आयोजित ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल बोस्टन (IIFFB)’ समारंभात दिवंगत अभिनेता ओम पुरी यांना 2020 सालाचा ‘IIFFB जीवनगौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले.

4) राष्ट्रीय जल जीवन अभियान 3 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा प्रभारी मंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे व्हर्च्युअल कॉन्फरन्स आयोजित करीत आहे.

5) टांझानिया देशात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉन मगुफुली विजयी झाले. टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतला एक देश आहे. त्याची राजधानी डोडोमा हे शहर आहे.

6) तामिळनाडू सरकारने नव्या वकीलांना दोन वर्षांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांची मासिक आर्थिक मदत देण्यासाठी यंग अ‍ॅडव्होकेट्स वेल्फेअर फंडची स्थापना केली.

7) नीती आयोगाच्या SATH-E (सस्टेनेबल अॅक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल इन एज्युकेशन) प्रकल्पाच्या अंतर्गत ओडिशा राज्यातल्या सर्व शाळा समाविष्ट करण्यात येत आहेत. या उपक्रमात तीन ‘आदर्श’ राज्ये तयार करण्याकरिता आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्त्वाच्या घटकांवर भर देण्यात आला आहे.

8) इंडसइंड बँक ही देशातली पहिली बँक ठरली आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या ‘अकाउंट अॅग्रीग्रेटर फ्रेमवर्क’ अंतर्गत ‘वित्तीय माहिती प्रदाता’ (FIP) म्हणून कार्यरत झाली आहे.

9) 30 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या केवडिया येथे विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. आरोग्य वन, आरोग्य कुटीर, एकता मॉल आणि बाल पोषण उद्यान या विकास कामांचे उद्‌घाटन केले गेले.

10) दरवर्षी 31 ऑक्टोबर या दिवशी जगभरात जागतिक शहरे दिन (World Cities Day) साजरा केला जातो. यावर्षी ‘व्हॅल्यूइंग अवर कम्युनिटीज अँड सिटीज’ या विषयाखाली जागतिक शहरे दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी नाकुरू (केनिया) येथे UNESCO संस्थेच्या नेतृत्वात जागतिक स्तरावरचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

‘वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता :

संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल. देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.

ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी.यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल. सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.

यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.

अमेरिका आणि युरोपमध्ये या वर्षीच्या ‘डेलाईट सेव्हिंग वेळ’ (DST) प्रणालीची सांगता झाली :

अमेरिकेमधले घड्याळ 1 नोव्हेंबर 2020 रोजी एक तास “मागे” केले गेले, ज्यामुळे या वर्षी ‘डेलाईट सेव्हिंग वेळ’ (DST) प्रणालीची सांगता झाली असे सूचित होते. युरोपमध्ये 25 ऑक्टोबरला हेच घडले.

अमेरिकेतली घड्याळे एक तास मागे गेल्यामुळे न्यूयॉर्क आणि भारत यांच्यातल्या काळाचा फरक सध्याच्या साडेनऊ तासांवरून आता साडेदहा तास झाला आहे.

‘डेलाईट सेव्हिंग वेळ’ म्हणजे काय आहे?

  • डेलाईट सेव्हिंग वेळ ही एक वेळ समायोजित करण्याची व्यवस्था आहे, ज्यामुळे घड्याळ पुढे केले जाते जेणेकरून हिवाळ्यात दिवसा कामकाजासाठी सूर्यापासून मिळणारा प्रकाश अधिकाधीक काळापर्यंत उपयोगात आणला जाऊ शकतो, ज्यामुळे विद्युत दिव्यांचा वापर कमी होतो. डेलाईट सेव्हिंग वेळेच्या संकल्पनेनुसार काही देशांमध्ये घड्याळाला 1 तासाने पुढे केले जाते.
  • घरामध्ये मेणबत्त्या वापरणे कमी करून पैसे वाचवण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या बेंजामिन फ्रँकलीन यांनी 1784 साली या प्रणालीचा शोध लावला होता. तथापि, युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात याची स्थापना वर्ष 1914 आणि वर्ष 1918 दरम्यान निश्चितपणे झाली आणि याला जगभरात मान्यता मिळाली. आज ही प्रणाली सुमारे 70 देशांमध्ये लागू आहे.
  • आजच्या काळात, मेणबत्त्या वापरणे कमी करणे हा उद्देश न ठेवता त्याऐवजी विशेषतः सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत विद्युत दिव्यांचा वापर कमी करणे हा उद्देश आहे.
  • भारत डेलाइट सेव्हिंग वेळ पाळत नाही, कारण विषुववृत्तीय जवळील देशांना ऋतुदरम्यान दिवसाच्या वेळात जास्त फरक जाणवत नाही.

Leave a Comment