चालू घडामोडी | 02 जुलै 2020

कोविड-19 चाचणीसाठी NBRI संस्थेनी प्रगत जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळेची स्थापना केली :

उत्तरप्रदेशाच्या लखनऊ शहरातल्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेनी (NBRI) कोविड-19 चाचणीसाठी “प्रगत जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळा (Advanced Virology Lab)” याची स्थापना केली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

ही जैवसुरक्षा स्तर (BSL) 3 या प्रकारची सुविधा आहे. जैवसुरक्षा स्तर हे कोणत्या प्रकारच्या परजीवीशी संबंधित आहे, हे स्पष्ट करते.

ICMRच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 साठी BSL 2 स्तराच्या सुविधेची शिफारस करण्यात आली आहे, परंतू ही एक प्रगत आवृत्ती आहे. या प्रगत आवृत्तीत एक “ऋण दबाव” (Negative Pressure) आहे, अर्थात त्यात सक्शनची सुविधा आहे जी हवेतले कोणतेही कण शोषून घेण्यास सक्षम आहे आणि फिल्टरमधून पाठवते.

कोविड-19 ची सुरक्षित चाचणी सुविधा प्रदान करण्यासाठी ही सुविधा विषाणू किंवा जीवाणू गाळू शकते आणि त्यांना वेगळे करते. तेथे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात दर दिवशी 100 नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यात वाढ करून 500 नमुन्यांची चाचणी केली जाणार.

बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार :

भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालायनं बुधवारी रद्द केल्या. या प्रक्रियेत चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे या अपग्रेडेशनसाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येणार आहेत.

यासाठी सहा जणांची समिती देखील नेमण्यात येणार आहे. 4G अपग्रेडेशनसाठी चिनी साधनं वापरु नका. साधाराण 7000 ते 8000 कोटींचे हे कंत्राट असणार आहे.

IIT मद्रासचा प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स विषयासाठी जगातला पहिला ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम :

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी 30 जून 2020 रोजी प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स या विषयासाठी जगातल्या पहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास या संस्थेनी तयार केला आहे. हा पदवी कार्यक्रम दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या आणि कोणत्याही विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी आपले नाव नोंदलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

ठळक वैशिष्ट्ये :

  • पदवीधर आणि कार्यरत व्यवसायिक देखील या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. वय, कोणतीही शाखा किंवा भौगोलिक स्थानाचे सर्व अडथळे दूर करून आणि कुशल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या डेटा सायन्स या विषयात जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश आता घेता येणार.
  • हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो, कार्यरत व्यवसायिकांना व्यवसायीकतेची संधी उपलब्ध करुन देतो आणि विद्यार्थ्यांना IIT मद्रास यासारख्या मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी मिळविण्याची संधीही प्रदान करतो.
  • हा कार्यक्रम अत्याधुनिक ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि जेथे डिजिटल साक्षरतेचा प्रसार कमी आहे अशा भारतातल्या अगदी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणार आणि कार्य जगतात त्यांच्या प्रवासात त्यांना पुढे मार्गक्रमण करण्यास मदत करणार.
  • ऑनलाइन लर्निंग मंचावर शिकण्याचा अनुभव हा वर्गातल्या नियमित शिक्षणासारखाच असावा हे सुनिश्चित करण्यासाठी, या कार्यक्रमामध्ये इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच अध्यापक, साप्ताहिक गृहकार्य आणि वैयक्तिक पर्यवेक्षण परीक्षांचे व्हिडिओ उपलब्ध असणार.
  • हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा डेटा व्यवस्थापित करण्याचे कौशल्य, अर्थव्यवस्थेची अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी नमुन्यांची कल्पना, मॉडेलची अनिश्चितता समजुन प्रभावी व्यवसायिक निर्णय घेण्यासाठी अंदाज तयार करण्यात मदत करणारे मॉडेल तयार करणार.
  • फाऊंडेशनल कार्यक्रम, डिप्लोमा कार्यक्रम आणि डिग्री कार्यक्रम या तीन वेगळ्या टप्प्यात हा अनोखा ऑनलाइन कार्यक्रम असणार आहे. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचे आणि IIT मद्रासकडून अनुक्रमे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळविण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.

Leave a Comment