चालू घडामोडी | 19 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारत 116 व्या क्रमांकावर आहे.

2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यात 1934 साली आलेल्या पूरात तसेच भारत-नेपाळ भूकंपात नष्ट झालेल्या ‘कोसी रेल मेगा पूल’चे उद्घाटन झाले. तो 1.9 किलोमीटर लांबीचा पूल आहे, जो ईशान्य भारताला जोडतो.

3) 16 सप्‍टेंबर 2020 रोजी सौदी अरब देशाच्या अध्यक्षतेत ‘जी-20’ देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यावर्षी जी-20 अंतर्गत उद्घाटन करण्यात आलेल्या “भूमी अवनती क्षपण विषयक जागतिक उपक्रम” आणि “प्रवाळ प्रदेश कार्यक्रम” तसेच कार्बन उत्सर्जनाचे व्यवस्थापन आणि हवामान बदल अनुकूलन यांच्याशी संबंधित दोन दस्तावेजांची त्यांनी प्रशंसा केली.

4) चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) शासित मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

5) भारतीय स्टेट बँक (SBI) आणि टायटन कंपनी यांनी योनो अॅपद्वारे संपर्क-विरहित पैसे देण्याच्या प्रक्रियेसाठी ‘टायटन पे’ घड्याळ तयार करण्यासाठी करार केला.

6) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल यांनी शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, 2020 आणि किंमत (हमीभाव व शेत सेवा विधेयक, 2020) वरील शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) कराराचा निषेध करत राजीनामा दिला आहे.

7) NASA आणि नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरीक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेच्या अभ्यासानुसार, सूर्याच्या 25 व्या चक्रकालाचा (सोलार सायकल 25) आरंभ झाला आहे. सौर चक्र – सूर्य हा विद्युत-भारीत गरम वायूचा एक प्रचंड गोल आहे. वायू गतिशील असल्यामुळे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करते. ते चुंबकीय क्षेत्र एका मर्यादित कालावधीपूरताच असते, ज्यात बदल होत असतो, या घटनेला सौर चक्र असे म्हणतात. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र प्रत्येक 11 वर्षांनी पूर्णपणे पलटते. या घटनेचा प्रभाव रेडिओ संचार सुविधा, उपग्रह, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि त्यांचा जीवनकाळ, विद्युत ग्रीड इत्यादींवर विपरीत होऊ शकतो.

खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर :

लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ३० टक्के कपात होणार आहे.

त्याचबरोबर प्रत्येक खासादाराला दरवर्षी देण्यात येणाऱ्या ५ कोटींच्या खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

कलम १०६ अंतर्गत सरकारने हे विधेयक आणण्यात आलं. एक वर्ष वेतन कपात होणाऱ्यांमध्ये पंतप्रधान, मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि खासदारांचा समावेश आहे. या विधेयकानुसार एप्रिल २०२० ते पुढील आर्थिक वर्षापर्यंत वेतन कपात होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ७९० खासदार असतात. यापैकी लोकसभेत ५४५ तर राज्यसभेत २४५ खासदार असतात. सध्या लोकसभेमध्ये ५४२ तर राज्यसभेत २३८ सदस्य कार्यरत आहेत. त्यामुळे एकूण खासदार संख्या ७८० इतकी आहे. त्यामुळेच प्रत्येक खासदाराच्या पगारामधून ३० हजार रुपयांची कपात केल्यास महिन्याला २ कोटी ३४ लाख रुपयांची बचत होणार आहे.

Leave a Reply