चालू घडामोडी | 19 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतात जन्म झालेले मायकेल इराणी (ब्रिटन) हे आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाचे नवीन अंतरिम अध्यक्ष आहेत. तामज अजान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची नेमणूक करण्यात आली.

2) जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ‘माय टाउन माय प्राइड’ कार्यक्रमाचा आरंभ केला.

3) ‘लँसेट मेडिकल’ अहवालानुसार, भारताचे आयुर्मान 70.8 वर्ष एवढे आहे. 1992 साली ते 59.6 वर्ष होते आणि 2019 साली 70.8 वर्षांवर पोहचले.

4) उत्तरप्रदेश राज्यात ‘मिशन शक्ती’ नावाने महिला सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे.

5) भारताने स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक निशाणा साधला.

6) विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अल्टिबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी बाकी ठेवून पटकावले. पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात झालेल्या या स्पर्धेत त्याने इराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत केले.

‘कपिला’ कलाम कार्यक्रम: बौद्धिक संपदेविषयीचे साक्षरता व जागृती अभियान

15 ऑक्टोबर 2020 रोजी माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते बौद्धिक संपदेविषयी साक्षरता व जागृती अभियान चालविण्यासाठी ‘कपिला’ कलाम कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.

‘कपिला’ कलाम अभियानाच्या अंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शोधाच्या एकाधिकारासाठी अर्ज करण्याच्या योग्य पध्दतीची माहिती मिळणार आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाणार.

15 ते 23 ऑक्टोबर हा सप्ताह ‘बौद्धिक संपदा साक्षरता सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘राष्ट्रीय शोध दिन’ निमित्त भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मानेचा रौप्यवेध :

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान हिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केली.

बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला होता. ६० वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने ६२७.५ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त के ले. शिओरी हिराटा हिने ६२२.६ गुणांसह रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबा हिने ६२१.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा याने ६३०.९ गुणांनिशी सुवर्णपदकावर नाव कोरले. शाहूने ६२३.८ गुणांसह रौप्यपदक पटकावले. बांगलादेशच्या बाकी अब्दुल्ला याने ६१७.३ गुणांसह कांस्यपदक प्राप्त के ले. इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्याने या स्पर्धेत खेळू शकली. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.

2 thoughts on “चालू घडामोडी | 19 ऑक्टोबर 2020”

Leave a Comment