चालू घडामोडी | 19 फेब्रुवारी 2021

 • भारतीय लष्करासाठी कॉम्बॅट नेट रेडिओ (CNR) या संवाद उपकरणाला स्वदेशी पर्याय – सॉफ्टवेअर डिफाइण्ड रेडिओ (SDR).
 • तीन वर्षात राबविला जाणारा उपक्रम, ज्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत मुलांचे बालपण केंद्रस्थानी ठेवून शेजारील परिसराचा विकास करण्यास मदत करणे हे आहे – ‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’.
 • 18 फेब्रुवारी 2021 रोजी उद्घाटन झालेल्या तिसऱ्या इंडिया टुरिझम मार्ट या कार्यक्रमाचा आयोजक – भारतीय पर्यटन आणि आतिथ्य महासंघ (FAITH).
 • 17 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने _____ उत्पादनांसाठी 5 वर्षात 12,195 कोटी रुपये नियत व्ययाची तरतूद असलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना लागू करायला मान्यता दिली आहे – दूरसंचार व नेटवर्किंग.
 • स्वमग्नता विकारग्रस्त (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर) 12 वर्षांची मुलगी, जीने बांद्रा-वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे 36 किलोमीटर अंतर 08 तास 40 मिनिटात पोहत पार करून विक्रम नोंदवला – कुमारी जिया राय.
 • जयदीप भटनागर यांची जागी, ऑल इंडिया रेडिओ (बातमी) याचे नवीन प्रधान महासंचालक – एन. वेणुधर रेड्डी.
 • ‘फ्रॅक्चर्ड मोझॅक’ पुस्तकाचे लेखक – सबर्ना रॉय.
 • 16 फेब्रुवारी 2021 रोजी निधन झालेले अमेरिकेचे हृदयरोग तज्ञ, ज्यांनी 1962 साली डायरेक्ट-करंट डिफिब्रिलेटर किंवा कार्डियोव्हर्टरचा शोध लावला आणि अणुयुद्धांविरूद्धच्या मोहिमेसाठी 1985 साली नोबेल शांती पुरस्कार जिंकला होता – डॉ. बर्नार्ड लॉन.
 • HCL टेक्नॉलॉजीजने (HCL) सायबरसुरक्षा क्षेत्रात सहयोग करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IITK) सह सामंजस्य करार केला आहे.
 • 17 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या 11 व्या IEA-IEF-OPEC परिसंवादाचा अध्यक्ष – सौदी अरब.
 • संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्यावतीने अभिनव श्रेणीच्या अंतर्गत देण्यात आलेल्या ‘आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार 2020’ याचे विजेता – वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB), भारत.
 • _____ या संस्थेने नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ हवामान बदल परिषदेत जागतिक सौर बँक (WSB) सुरू करण्याची योजना आखली आहे – आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA).

Leave a Comment