चालू घडामोडी | 19 ऑगस्ट 2020

सत्यपाल मलिक: मेघालय राज्याचे नवे राज्यपाल

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सत्यपाल मलिक यांची मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तिपूर्वी सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल होते. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे.

राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यपालाच्या हाती असतो. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम राज्यपाल पाहतो.

भारतीय संविधानातले कलम 153 यानुसार, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. भारताचे राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम 155 अन्वये राज्यपालांची नियुक्ती करतात.

रोहित शर्मा-विनेश फोगाट-मनिका बत्राची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची यंदाच्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.

रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरु शकतो. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.

२०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

‘स्वास्थ्य’: आदिवासी लोकांचे आरोग्य व पोषण विषयक डिजिटल मंच :

17 ऑगस्‍ट 2020 रोजी आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी लोकांचे आरोग्य व पोषण विषयक ‘स्वास्थ्य’ नामक एका डिजिटल मंचाची घोषणा केली. भारतातल्या आदिवासींची आरोग्य आणि पोषणविषयक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे हे पहिलेच ठिकाण आहे.

हा मंच पुरावा, कौशल्य आणि अनुभवांची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी अभिनव पद्धती, संशोधनाचे संक्षिप्त तपशील, प्रकरणे आणि भारतातल्या विविध भागांतून गोळा केलेल्या सर्वोत्तम पद्धती उपलब्ध करून देणार.

भारताचा GDP २६ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता :

करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा आर्थिक विकास दरात विक्रमी घसरण झाली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत अधिकृत मंदी जाहीर करण्यात आली आहे. आता अशीच परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेत दिसू लागली आहे.

जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी घसरण होऊ शकते. अर्थव्यवस्था जून तिमाहीत १३.६ ते २५.७ टक्केपर्यंत घसरू शकते. जीडीपीचे आकडे अधिकृतपणे ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाणार आहेत. याआधी ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ३.१ टक्के दराने वाढली होती.

तेव्हा भारतात करोना व्हायरस आला नव्हता. तरी अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला होता. हा एक प्रकारे इशाराच होती की पुढील वाटचाल धीमीच असेल. २०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ४.२ टक्क्यांनी वाढत होती. २०२०च्या जून तिमाहीत अर्थव्यवस्था ५.२ टक्के दरांनी वाढत होती. पण यावेळी जून तिमाहीमधील घसरण विक्रमी असू शकते असा अंदाज आहे.

अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारताला प्रथम कोरनावर नियंत्रण मिळवावे लागेल. त्याच बरोबर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अन्य सपोर्ट गोष्टी कराव्या लागतील.

Leave a Reply