चालू घडामोडी | 18 जून 2020

UNSC : आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड :

भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली. दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.

१९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.

भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. “भारताची २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे.

‘IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक :

इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.

कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.

  • इतर ठळक बाबी : या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे. सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते.
  • शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
  • सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे. मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
  • BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.
  • सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.

इकॉनॉमिक फोरमच्या यादीत भारत :

वर्ल्ड इकॉनॉमिक फाेरमने २०२० च्या १०० तंत्रज्ञान कंपन्यांची यादी जारी केली आहे. यामध्ये दोन भारतीय स्टार्टअप कंपन्या स्टेलअॅप्स आणि जेस्टमनी स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. याआधी गुगल, एअरबीएनबी, किकस्टार्टर, मोझिला, स्पॉटिफाय, टि्वटर आणि विकिमीडियासारख्या कंपन्याही या प्रतिष्ठित यादीचा भाग राहिल्या आहेत.

वर्ल्ड इकाॅनॉमी फोरम १०० संस्थांची यादी तयार करते, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक मुद्दे हाताळते. डब्ल्यूईएफने सांगितले की, निवडलेल्या १०० फर्म्सपैकी एक चतुर्थांश महिला नेतृत्वाच्या आहेत. या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेपासून कार्बन कॅप्चरपर्यंत हवामान बदलाच्या संरक्षणासाठी नवोन्मेषाचा उपयोग करतात, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आहे तसेच समाजाला चांगल्या भवितव्याकडे नेण्यात मदत करतात.

डब्ल्यूईएफच्या निवेदनानुसार, या कम्युनिटीत समाविष्ट झाल्याने तंत्रज्ञान कंपन्या फोरमचा पुढाकार, अॅक्टिव्हिटीज, इव्हेंट्स होतात अशा ठिकाणी २ वर्षांचा प्रवास सुरू करतील.

जेस्टमनीची स्थापना लिजी चॅपमन, प्रिया शर्मा आणि आशिष अनंथरमण यांनी केली. हे स्टार्टअप ग्राहकाला कर्ज देतात. ज्यांच्याकडे कर्जाचा चांगला पूर्व इतिहास नसल्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा अन्य औपचारिक वित्तीय पर्यायापर्यंत पोहोच नाही अशा युजर्सला सक्षम बनवणे हे स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे.

ओडिशामधील महानदीमध्ये 500 वर्ष जुनं मंदिर साडलं :

ओडिशामधील महानदीमध्ये काही दिवसांपूर्वीच एक 500 वर्ष जुनं मंदिर साडलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथेही एक पुरातन शिवमंदीर सापडलं आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार वाळूच्या उपश्यासाठी खोदकाम करताना पुरातन शिवमंदीराचे अवशेष सापडले आहेत. तर नेल्लोमधील पेन्ना नदीच्या पात्रामध्ये वाळूचा उपसा सुरु असताना एक मंदिरासारखे बांधकाम आढळून आलं आहे.

वेन्ना नदीच्या काठावर असणाऱ्या पेरुमल्लापडू गावामध्ये वाळूचा उपसा सुरु होता. त्याचवेळी वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये मंदिराचा कळस आणि प्रवेशद्वारासारखे बांधकाम आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे 200 वर्षांपूर्वीचे शिवमंदीर आहे.

Leave a Reply