चालू घडामोडी | 18 जुलै 2020

0

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी NTPC आणि NIIF यांच्यात करार :

NTPC मर्यादित या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वीज निर्मिती कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा, वीज वितरण यासारख्या क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष (NIIF) सोबत सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारतातील शाश्वत आणि मजबूत ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी सुलभता येणार आहे. NIIFच्या सहकार्याने NTPC त्याचे तांत्रिक कौशल्य वापरुन भांडवल उभे करणार आहे, जे अक्षय ऊर्जा क्षेत्राला पुरवले जाणार.

भारतातील 27 कोटी 30 लाख लोक दारिद्य्राच्या बाहेर आले संयुक्त राष्ट्रे:

भारताने सन 2005-6 ते 2015- 16 या दहा वर्षाच्या काळात देशातील गरिबी निर्मूलन कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली असून या कालावधीत देशातील तब्बल 27 कोटी 30 लाख लोक दारिद्य्राच्या बाहेर येऊ शकले आहेत अशी माहिती संयुक्‍त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे.

संयुक्‍त राष्ट्रांची यूएनडीपी संस्था आणि ऑक्‍स्फर्ड पॉवर्टी ऍन्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थांनी संयुक्‍तपणे तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वरील नमूद केलेल्या काळात भारताने उपेक्षित वर्गातील अनेक प्रकारच्या समस्या दूर केल्या आहेत.

आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा, कामाची खालावलेली स्थिती, हिंसेचा सामना करावा लागणे, अशा साऱ्या निकषातून भारताने वर नमूद केलेल्या काळात या उपेक्षित वर्गाला बाहेर यशस्वीपणे बाहेर काढले आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मल्टी डायमेंशनल पॉवर्टी निर्देशांक या तत्त्वाने या समित्यांनी 65 देशांतील गरिबांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात भारताची ही कामगिरी सरस ठरली आहे.

रेयाल माद्रिदला विक्रमी 34वे विजेतेपद- ला लिगा फुटबॉल :

रेयाल माद्रिदने विक्रमी 34व्यांदा ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. व्हिलारेयालला 2-1 नमवत एक लढतआधीच माद्रिदने चषक उंचावला.

माद्रिदचे हे 2017 नंतरचे पहिले ला-लिगा विजेतेपद ठरले. माद्रिदचा हा या स्पर्धेतील सलग 10वा विजय ठरला.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम कंपनीसाठी वीजेवर चालणारे स्वयंचलित जहाज तयार करणार :

नॉर्वेतील किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्वात मोठ्या नोर्जेस ग्रूपेन ए.एस.ए. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. या कंपनीचे कंत्राट कोचीन शिपयार्डने मिळवले आहे.

कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय जहाजबांधकाने नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. संस्थेसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाज / बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here