चालू घडामोडी | 18 फेब्रुवारी 2021

 • 17 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ____ यांच्यामधील व्यापक आर्थिक सहकार व भागीदारी करारावर (CECPA) स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली, जो की आफ्रिकेतील एखाद्या देशासह भारताने केलेला पहिला व्यापार करार असेल – मॉरिशस.
 • 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी 2021 रोजी ____ येथे “पेट्रोलियम-कोळसा-वायु: हरित ऊर्जा संक्रमणासाठी अभिनवता आणि तंत्रज्ञान” या संकल्पनेखाली 11 वी जागतिक पेट्रोकोल परिषद आणि जागतिक भविष्य इंधन शिखर परिषद यांची संयुक्त परिषद पार पडली – नवी दिल्ली.
 • देशातील आणि जगातील प्रथम ‘म्यूजियम बिएनाले’ – बिहार म्यूजियम बिएनाले, पटना.
 • प्रादेशिक पारंपारिक औषध कृती योजनेच्या अंमलबजावणीस समर्थन देण्यासाठी तज्ञांच्या प्रतिनियुक्तीसाठी _____ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाने एका करारावर स्वाक्षरी केली – आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालय, भारत.
 • 17 फेब्रुवारी 2021 रोजी ____ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) नागरी अंतराळ क्रियाकलापांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी एक सामंजस्य करार केला – ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी.
 • भारत आणि ____ यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) मधील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बारकाईने लक्ष देवून काम करण्याचे मान्य केले आहे – रशिया.
 • गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने जल जीवन मिशन-अर्बन, JJM-U अंतर्गत पायलट पे जल सर्वेक्षण चालू केले आहे.
 • सुरक्षित आणि शाश्वत वाहतुकीशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत “_____-इंडिया मोबिलीटी हॅकाथॉन: चेंजिंग द वे वुई मुव्ह!” कार्यक्रम आयोजित करण्यात आला – स्वीडन.
 • _____ येथे 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 पर्यंत जागतिक यात्रा व पर्यटन परिषद (WTTC) 20 वी जागतिक शिखर परिषद होणार आहे – कॅनकुन, मेक्सिको.
 • भारतीय पशू कल्याण मंडळ (AWBI) यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘प्राणी मित्र पुरस्कार (वैयक्तिक) 2021”चे विजेते – योगेंद्र कुमार, मनीष सक्सेना आणि श्याम लाल चौबीसा.
 • ‘स्कोच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर 2021’ पुरस्काराचे विजेता – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी.
 • चीनमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारणारे भारताचे ज्येष्ठ अधिकारी – सिद्धार्थ चटर्जी.
 • _____ राज्यात भारताच्या पूर्वेकडील क्षेत्रात अखंड संपर्क प्रदान करणाऱ्या ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ कार्यक्रमाचा शुभारंभ झाला – आसाम.
 • या राज्य सरकारने लहान वयातच भाष्य आणि श्रवणविषयक व्याधी शोधण्यासाठी एक तपासणी कार्यक्रम चालवला आहे – आंध्रप्रदेश.
 • ____ महासागराच्या उत्तरेकडील भागात आयोजित करण्यात आलेल्या “इराण-रशिया मेरीटाईम सेक्युरिटी बेल्ट 2021” या दोन दिवसांच्या नौदलाच्या कवायतीत भारत सामील झाला आहे – हिंद महासागर.
 • 1965 च्या भारत-चीन युद्धाच्या आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धासह मोठ्या युद्धात भाग घेतलेले युद्ध ज्येष्ठ मेजर जनरल (निवृत्त) बसंतकुमार महापात्रा यांचे निधन झाले आहे.

Leave a Comment