चालू घडामोडी | 18 ऑगस्ट 2020

कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी रिहांद येथे NTPC कडून पायाभूत सुविधेची स्थापना :

देशातली सर्वाधिक ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी म्हणजेच NTPC लिमिटेड या कंपनीने दूरवरच्या सिमेंट प्रकल्पांना स्वस्त दरात कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी उत्तरप्रदेशातल्या रिहांद प्रकल्पात पायाभूत सुविधेची उभारणी केली आहे.

उत्तरप्रदेशातल्या टीकरिया शहरापासून 458 कि.मी. अंतरावरील ACC सिमेंट उत्पादक प्रकल्पाला कोळशाची राख पुरविण्यासाठी 3450 मेट्रिक टन (MT) कोळशाची राख वाहून नेणाऱ्या BOXN प्रकारच्या रेल्वे वॅगनच्या पहिल्या रेकला NTPCच्या रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे कार्यकारी संचालक बालाजी अय्यंगार यांनी 16 ऑगस्ट 2020 रोजी हिरवा झेंडा दाखविला.

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती :

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अस्थाना १९८४ बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत.

त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. १९९७ साली चारा घोटळायात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती. सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते.

मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल :

भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल बांधत आहे. नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन :

हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांसह संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

आपल्या गायकीने अनेक वर्ष देश विदेशातील चाहत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते.

आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने 11 नोव्हेंबर 2006 मध्ये ‘2006 व्हीपी 32’ या छोट्या ग्रहाला पंडितजसराज असं नाव देऊन जसराज यांचा गौरव केला होता. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत.

Leave a Reply