चालू घडामोडी | 17 सप्टेंबर 2020

1) योशिहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शिंजो आबे यांनी राजीनामा दिला होता. जपानमधील सत्ताधारी पक्षाने शिंजो यांच्या जागी योशिहिदे यांची निवड केली.

2) नवीन बँकिंग नियमन (दुरुस्ती) विधेयक, 2020 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आले.

3) महाराष्ट्रात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्य व्यापी कार्यक्रमास सुरुवात झाली.

4) मनीला (फिलिपिन्स) येथे आशियाई विकास बँकेच्या (ADB) भारतासाठी कार्यकारी संचालक पदावर समीर कुमार खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या मुदतीसाठी करण्यात आली.

5) दरवर्षी 15 सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन पाळला जातो. 2020 साली हा दिन ‘कोविड-19: ए स्पॉटलाइट ऑन डेमोक्रसी’ या विषयाखाली पाळला गेला.

6) राजेश खुल्लर यांची भारत, बांगलादेश, भुटान आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी शहरातल्या जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर तीन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली. ते पदावर ऑगस्ट 2023 पर्यंत असणार.

7) 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनानिमित्त, ‘मिशन शक्ती’च्या स्मरणार्थ एक स्मारक टपाल तिकिट प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘मिशन शक्ती’च्या अंतर्गत “ए-सॅट” नामक स्वदेशी उपग्रह-भेदी क्षेपणास्त्र तयार करण्यात आला.

8) महाराष्ट्रातील माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण :

सहकारी बँकांमधील ठेवीदारांचे हितरक्षण केले जावे, या उद्देशाने या बँका पूर्णत्वाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेख व नियंत्रणाखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला बुधवारी लोकसभेने मंजुरी दिली.

मुंबईतील पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेतील उघडकीस आलेल्या गैरव्यवहारानंतर, आवश्यक उपाययोजना म्हणून ‘बँकिंग नियमन (दुरुस्ती) विधेयक, २०२०’ तयार केले गेले.

तातडीने पावले टाकली जाणे आवश्यक असल्याने २६ जून रोजी वटहुकुमाद्वारे विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केली गेली. आता त्याची जागा लोकसभेने संमत कायद्यानेच घेतली आहे. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, हा कायदा ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आहे, सहकारी संस्था निबंधकांचे अधिकार गुंडाळण्यासाठी नाही.

सहकारी बँकांच्या कारभारात व्यावसायिकता आणण्यासह, या बँकांना भागभांडवल वाढविणे सोयीस्कर ठरेल, अशा तरतुदींसह त्यांचे सशक्तीकरण हे रिझव्‍‌र्ह बँकेकडे देखरेख गेल्याने शक्य बनणार आहे.

कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत :

जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होईल.

मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे. असा अंदाज आहे की, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातील जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेली स्वायत्त संस्था आघारकर संशोधन संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासात आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत. हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.

आघारकर संस्थेच्या संशोधनात असेही आढळले आहे की, मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्‍या मिथेनोजेन शोधून काढले, जे उर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते. हा अभ्यास ‘मरीन जिनोमिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आला आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 17 सप्टेंबर 2020”

Leave a Comment