चालू घडामोडी | 17 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) १७ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन’ म्हणून साजरा केला जातो.

2) रशियामध्ये एक वाघिण झाडाला मिठी मारत असताना छायाचित्र काढणाऱ्या सर्जी गोर्शकोव्ह यांना ‘वर्ष 2020 चा वन्यजीव छायाचित्रकार’ हा सन्मान प्राप्त झाला.

3) आंतरराष्ट्रीय सौर युतीचे (ISA) अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष म्हणून अनुक्रमे भारत आणि फ्रान्स या देशांची दोन वर्षाच्या कालावधीसाठी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिसऱ्या आभासी बैठकीत फेरनिवड झाली.

4) अमेरिकेच्या स्पेसएक्स ही खासगी कंपनी 10 नोव्हेंबर 2020 रोजी ‘सेंटिनेल-6 मायकेल फ्रीलीच’ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. वाढणाऱ्या समुद्राची पातळी मोजण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग केला जाणार आहे.

5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “स्ट्रेन्दनिंग टिचिंग-लर्निंग अँड रिजल्ट्स फॉर स्टेट्स” अर्थात “राज्यांसाठी अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आणि परिणाम बळकटीकरण” (स्टार्स / STARS) प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. हा मुळात जागतिक बँकेच्यावतीने सादर करण्यात आलेला उपक्रम आहे.

6) अन्नप्रक्रिया मंत्रालय ‘ऑपरेशन ग्रीन’ याची अंमलबजावणी करीत आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नाला योग्य भाव मिळवा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

7) केंद्रीय मंत्रिमंडळाने जागतिक बँकेस स्टेटस-स्टार्स प्रकल्पासाठी शिक्षण आणि परिणामांचे बळकटीकरण समर्थित करण्यास मान्यता दिली आहे.

8) केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केरळमधील 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.

9) प्रख्यात मल्याळम कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाकवी अकीथम अच्युथन नंबोथीरी यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

लष्करप्रमुख नरवणे यांना मिळणार ‘जनरल ऑफ नेपाळ आर्मी’ सन्मान :

भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांना नेपाळच्या नियोजित दौऱ्यात नेपाळ सरकार ‘ जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ ही मानद रँक देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. नेपाळ आणि भारत या दोन देशातील मजबूत सैन्य संबंधाची ओळख म्हणून हा परंपरागत सन्मान दिला जातो.

भारत सरकार सुद्धा असा सन्मान नेपाळ लष्कर प्रमुखाना देत असते. मात्र सध्या नेपाळ आणि भारत याच्यात सीमा वादावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या राष्टपती विद्यादेवी भंडारी जनरल नरवणे यांना या सन्मानाने गौरविणार असल्याचे त्याला विशेष महत्व दिले जात आहे.

असा सन्मान देण्याची सुरवात १९५० साली झाली आहे. जनरल नरवणे नेपाळ दौऱ्यात तेथील सेना प्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा व संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्या बरोवर महत्वाची चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत :

उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे. आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

1971 मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी 38 ठिकाणे आहेत. दक्षिण आशियात भारताची एकूण 38 पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.

जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र 20 कोटी हेक्टरचे आहे. भारताच्या 10 पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता.

इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.

Leave a Comment