चालू घडामोडी | 17 मार्च 2021

MPSC Current Affairs | 17 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 15 मार्च 2021 पासून आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे नवीन महासंचालक – अजय माथुर.
 • म्यानमारचे नवीन उपराष्ट्राध्यक्ष – महन विन खिंग थान.
 • सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी, ज्याने ‘बचत प्लस’ नावाची नवीन पॉलिसी सादर केली – भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC).
 • या राज्य सरकारने 14 मार्च 2021 रोजी दोन दिवस चालणाऱ्या वसंत महोत्सवाचे उद्घाटन केले – उत्तराखंड.
 • _____ संस्थेच्या वैज्ञानिकांनी पर्यावरणाशी संपर्क आल्यानंतर पदार्थाची नवीन अवस्था दाखविणारा पदार्थ शोधून काढला आहे, ज्याचा उपयोग क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होऊ शकतो – रमन संशोधन संस्था (RRI).
 • FICCI संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रसायन व पेट्रोरसायने विभाग 17 मार्च ते 19 मार्च 2021 पर्यन्तच्या कालावधीत _____ येथे “इंडिया: ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स” या विषयासह 11 वे ‘इंडिया-केम-2021’ हा कार्यक्रम आयोजित करीत आहे – नवी दिल्ली.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील असलेले _____ बंद करण्याला परवानगी दिली आहे – हस्तकला व हातमाग निर्यात महामंडळ (HHEC).
 • ‘राष्ट्रीय औषधीनिर्मिती शिक्षण व संशोधन संस्था (दुरुस्ती) विधेयक 2021’ मध्ये ______ येथे अस्तित्त्वात असलेल्या सहा संस्थांना ‘राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था’ घोषित करण्याची तरतूद आहे – अहमदाबाद, गुवाहाटी, हाजीपूर, हैदराबाद, कोलकाता आणि रायबरेली.
 • ______ याने ‘डेअरी सर्व्हेअर’ मोबाइल अॅप तयार केले आहे – राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ (NDDB).
 • ‘राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता व व्यवस्थापन संस्था विधेयक 2019’ यामध्ये ____ येथील दोन अन्न तंत्रज्ञान संस्थांना ‘राष्ट्रीय महत्व असलेली संस्था’ हा दर्जा देण्यात आला आहे – कुंडली (हरयाणा) आणि तंजावूर (तामिळनाडू).
 • भारतीय वायु सेना एप्रिलच्या मध्यामध्ये राफेल लढाऊ विमानाचे दुसरे पथक उभा करणार असून हे पश्चिम बंगालमधील हसीमारा हवाई तळावर आधारित असेल.
 • रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने एक नवीन योजना जाहीर केली आहे ज्या अंतर्गत कोणतेही पर्यटक वाहन ऑपरेटर “ऑल इंडिया ट्रॅव्हल ऑथरायझेशन / परमिट” साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतात;

जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांमध्ये २२ शहरे एकट्या भारतात असून दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. स्वित्झर्लंडमधील ‘आयक्यू-एअर’ या संस्थेने हवेच्या दर्जाबाबत अहवाल तयार केला असून त्यात हे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

‘आयक्यू-एअर’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात जगभरातील प्रमुख शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचा आढावा घेण्यात आला. अहवालानुसार, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये दिल्लीतील प्रदूषणाचा दर्जा १५ टक्क्यांनी सुधारला आहे. मात्र ही सुधारणा होऊनही जगातील सर्वांत प्रदूषित दहा शहरांमध्ये दिल्लीचे नाव असून ती सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे.

पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर चीनमधील शिनजिआंग हे शहर असून त्यानंतर सलग नऊ क्रमांकावर भारतातील शहरे आहेत. अहवाल तयार करताना १०६ देशांमधील पीएम२.५ कणांच्या हवेतील प्रमाणाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. लॉकडाउनमुळे जगभरात प्रदूषणात घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

भारतातील प्रदूषित शहरे

 • उत्तर प्रदेश : गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मीरत, आग्रा आणि मुझफ्फरनगर
 • बिहार : मुझफ्फरपूर
 • हरियाना : फरीदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहताक, धारुहिरा
 • राजस्थान : भिवडी

“मिशन सागर-4”: INS जलश्व जहाज मदत घेऊन कोमोरोस देशात पोहचले

भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-4’चा एक भाग म्हणून “INS जलश्व” हे जहाज अन्नधान्य घेऊन कोमोरोस देशाच्या अंजौयन बंदरावर पोहोचले. जहाजाने 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठविण्यात आला आहे.

या मोहिमेमधून भारत सरकारकडून आपल्या मित्र देशांना नैसर्गिक संकटे आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे.

कोमोरोस हे हिंद महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक गरीब बेट-राष्ट्र आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी आहे. कोमोरियन फ्रॅंक हे राष्ट्रीय चलन आहे.

Leave a Comment