चालू घडामोडी | 17 फेब्रुवारी 2021

 • भारतीय नौदलाची स्कॉर्पियन-श्रेणीची तिसरी पाणबुडी, जी मुंबईत सामील करून घेण्यात आली – INS करंज (इतर दोन: खंदेरी, कलवरी).
 • तेलंगणा येथील अभियंता मनसा वाराणसी यांना मुंबईत व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड म्हणून गौरविण्यात आले.
 • 10000 संज्ञेसह भारतीय सांकेतिक भाषा (ISL) शब्दकोशाची तिसरी आवृत्ती तयार करणारी संस्था – भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (ISLRTC).
 • गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने प्रायोगिक ‘पेय जल सर्वेक्षण’ _____ या 10 शहरांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे – आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चूरू, कोची, मदुराई, पटियाला, रोहतक, सूरत आणि तुमकूर.
 • भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद (ICFRE, देहरादून) आणि ____ या संस्थांनी वनीकरण संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या उद्दीष्टांसह सामंजस्य करार केला – भारतीय वनस्पतिशास्त्रविषयक सर्वेक्षण (BSI), कोलकाता.
 • ‘केरळ साहित्य अकादमी पुरस्कार 2019’ मधील सर्वोत्कृष्ट कादंबरी – एस. हरेश लिखित ‘मीशा’.
 • ‘केरळ साहित्य अकादमी पुरस्कार 2019’ मधील सर्वोत्कृष्ट कविता – पी. रमन लिखित राथरी पंद्रंदरायक ओरु थरात्तू.
 • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने (ISA) डॉ. अजय माथूर यांना आयएसएच्या पहिल्या विशेष सभेत निवडल्यानंतर त्यांना नवीन महासंचालक म्हणून घोषित केले.
 • ____ येथे कुख्यात दरोडेखोरांनी वापरलेल्या कलाकृतींचे संग्रहालय उभारले जाणार आहे – भिंड, मध्यप्रदेश.
 • या राज्य सरकारने 15 फेब्रुवारी रोजी राज्यात ‘माँ’ योजनेचा शुभारंभ केला असून लोकांना फक्त पाच रुपयांत जेवण दिले जाणार – पश्चिम बंगाल.
 • या राज्य सरकारने पुढच्या सहा महिन्यांमध्ये प्राथमिक शाळांना प्रेरक शाळेमध्ये बदलण्याच्या हेतूने ‘प्रेरक अभियान’ची सुरुवात केली – उत्तरप्रदेश.
 • संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी (UNCDF) याचे नवे कार्यकारी सचिव – प्रीती सिन्हा.
 • 16 फेब्रुवारी 2021 रोजी ___ येथे ‘G5 सहेल’ शिखर परिषदेचे उद्घाटन झाले – चाड, फ्रान्स.

1 thought on “चालू घडामोडी | 17 फेब्रुवारी 2021”

Leave a Comment