चालू घडामोडी | 17 ऑगस्ट 2020

0

भारताची गगनयान मोहीम लांबणीवर पडण्याची शक्‍यता :

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही मानव रहित अंतरीक्ष मोहीम डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली जाणार होती. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे.

त्या आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. त्यातील पहिले चाचणी यान डिसेंबर 2020 मध्ये अंतरीक्षात पाठवले जाणार होते. इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगातर्फे या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर या विषयीचा अंतिम निर्णय जाहींर केला जाणार आहे.

इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान हेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला सन 2022 मध्ये 75 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमीत्त भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे. ही भारताची स्वदेशी तंत्राने होणारी पहिलीच मानवासहित अंतराळ मोहीम असणार आहे. त्यासाठीची तयारी इस्त्रोने सुरू केली आहे.

तथापि मुख्य मोहीमेच्या आधी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये मानवरहित याने अंतराळात पाठवली जाणार आहेत. त्यातील यंदाच्या डिसेंबर मधील मोहीम पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता आहे. करोनामुळे इस्त्रोच्या ज्या मोहीमांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे त्यात चांद्रयान तीनचाही समावेश आहे.

‘प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा :

देशातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या नव्या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा केली.

‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफंट’ यांच्या यशानंतर आता आगामी काळात आशियाई सिंह आणि गंगा डॉल्फिन या प्रजातींच्या संवर्धनासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने 10 वर्षांच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे.

गंगा डॉल्फिन (शास्त्रीय नाव: प्लॅटनिस्टा गंगेटिका गंगेटिका / गंगेटिक रिव्हर डॉल्फिन) ही प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये आढळणारी गोड्या पाण्यातली डॉल्फिन प्रजाती आहे. आशियाई सिंह (शास्त्रीय नाव: एशियाटिक लायन) ही भारतातली ‘पॅंथरा लियो’ या कुटुंबातली एक प्रजाती आहे. आज भारतात ही प्रजाती गुजरातच्या गिर राष्ट्रीय उद्यानापुरतीच मर्यादित आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे 10 सदस्यांचे पथकही मॉरिशसला पाठवले :

मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने 30 टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे 10 सदस्यांचे एक पथकही मॉरिशसला पाठविण्यात आले आहे, हे पथक तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात निष्णात आहे, हे पथक मॉरिशसला तांत्रिक आणि तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात सहकार्य करणार आहे.

असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर जपानचे एक जहाज खडकावर आदळले आणि त्यामधून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम असलेल्या क्षेत्रात हजारो टन तेलगळती होत आहे. एमव्ही वाकाशिओ या जहाजाचे तुकडे झाल्याचे शनिवारी मॉरिशसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन :

भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते मंत्री देखील होते.

दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान हे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

चेतन चौहान हे भारताकडून 40 कसोटी सामने खेळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here