चालू घडामोडी | 16 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस ‘ओझोन दिवस’ म्हणून जगभर साजरा होतो.

2) सप्टेंबर 2020 महिन्यात कतार देशात अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये ऐतिहासिक शांती चर्चा झाली. दोन्ही पक्षात समेट घडवून आणून प्रादेशिक शांतता कायम राखण्याच्या उद्देशाने तसेच कैदेत ठेवण्यात आलेल्या दोन्ही पक्षाच्या सैनिकांची सुटका करण्यासाठी ही शांती चर्चा झाली.

3) उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने भारतातल्या ‘घाऊक किमतीवर आधारित ऑगस्ट 2020 (अंतिम नसलेला) तर जून 2020 साठी अंतिम निर्देशांक प्रसिध्द केला. मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) यावर आधारित चलन वाढीचा ऑगस्ट 2020 महिन्यासाठीचा दर 0.16 टक्के (तात्पुरता) आहे. ऑगस्ट 2020 महिन्यासाठी मासिक WPI यावर आधारित खाद्यान्न निर्देशांक 153.3 एवढा आहे.

4) राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी हरिवंश नारायण सिंग यांची निवड झाली. ते या पदावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ही निवड भारतीय संविधांच्या अनुच्छेद 89 अन्वये करण्यात येते. 14 सप्टेंबर 2020 पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.

5) महाराष्ट्र राज्य शासनाने वैद्यकीय प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहनांना एक वर्षासाठी रूग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.

6) ‘प्रोजेक्ट 17ए’ अंतर्गत तयार करण्यात आलेले भारताचे पुढच्या पिढीचे लढाऊ जहाज मुंबईच्या मझगाव डॉक येथे तयार करण्यात आले. या जहाजावर ‘बराक 8’ आणि ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आल्या आहेत. ते जहाज हिंद महासागर प्रदेश आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात पाळत ठेवणार.

7) जापानच्या नाओमी ओसाका हिने ‘यू.एस. ओपन 2020’ या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरिया अझरेंकाचा पराभव करीत महिला एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले. नाओमी ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

8) समीर कुमार खरे यांना आशियाई विकास बँक (ADB), मनिलाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड :

संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर (विमेन स्टेट कमीशन) सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. भारतासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, कारण यात चीनवर मात करण्यात यश आले आहे. चीनने ही निवडणूक गांभीर्याने लढवूनही त्यात त्यांना यश आले नाही.

महिला स्थिती आयोग हा लिंगभाव समानता व महिला सक्षमीकरण या मुद्दय़ांना महत्त्व देतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक मंडळा अंतर्गत या महिला आयोगाचा समावेश होतो. मंडळाची २०२१ या वर्षांतील पहिली सभा आमसभेच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यात आशिया-पॅसिफिक भागात सदस्यपदाच्या दोन जागांकरिता निवडणूक घेण्यात आली.

या दोन जागांकरिता अफगाणिस्तान, भारत व चीन रिंगणात होते. अफगाणिस्तानचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रातील राजदूत अॅाडेला राझ यांनी केले, त्यांना ३९ मते मिळाली. भारताला ३८ मते मिळाली. चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असूनही त्या देशाला केवळ २७ मतांवर समाधान मानावे लागले.

अवनी दोशी बुकर पुरस्काराच्या लघुयादीत:

यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे. यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.

पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नाही. अवनी दोशी या अमेरिकेत जन्मल्या असून सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधील संघर्षपूर्ण नातेसंबंधांची गोष्ट सांगते.

दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले.

माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन:

माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते.

Leave a Reply