चालू घडामोडी | 16 मार्च 2021

MPSC Current Affairs | 16 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


सार्वजनिक वितरण केंद्रांना शोधण्यासाठी “मेरा रेशन” मोबाईल अ‍ॅप :

ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले. “एक राष्ट्र एक शिधापत्रिका” (ONORC) योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना होईल.

एक राष्ट्र, एक शिधापत्रिका यंत्रणा ही महत्वपूर्ण नागरीक केंद्रीत योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) या अंतर्गत लाभार्थ्यांना विशेषतः स्थलांतरीत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशातील कोणत्याही शिधावाटप दुकांनातून (स्वस्त धान्य दुकान) शिधा मिळणे सुनिश्चित केले आहे. वर्तमानात या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86 टक्के NFSA लोकसंख्या) आहेत.

भारतीय भूदल स्वदेशी “मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणाली खरेदी करणार :

भारतीय भूदल स्वदेशी “मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणाली खरेदी करणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत ही खरेदी केली जाणार आहे.

“मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणालीमुळे भारतीय भूदलाची कार्यक्षम संपर्क क्षमता वाढेल. ते एक सहज हाताळण्याजोगे, हलके, एकात्मिक संपर्क उपकरण आहे. ही उपकरण उपग्रहाच्या माध्यमातून माहिती पाठवू वा प्राप्त करू शकते.

अन्नू राणीचा नवा राष्ट्रीय विक्रम :

अन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.

राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. सविता पाल हिने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले.

किरण बलियान याने गोळाफेक प्रकारात १६.४५ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. तामिळनाडूच्या रॉसी पौलराजने पोलव्हॉल्ट प्रकारात ३.८० मीटर इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली.

पोलीस दलातील सुभाष पुजारी ठरले ‘महाराष्ट्र मास्टर श्री’ :

“मास्टर महाराष्ट्र श्री २०२१ या शरीरसौप्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाकडून खेळताना ८० किलो वजनी गटामध्ये महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावत एक नव्या यशाला गवसणी घातली आहे.

शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मेडल मिळविणारे सुभाष पुजारी हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आधिकारी आहेत. आपली नोकरी संभाळून दिवसातून किमान 5 तास व्यायाम करणारे पुजारी हे खऱ्या अर्थाने तरुणांना प्रेरणा देणारे अधिकारी ठरले आहेत.

या कामगिरीमुळे पुजारी यांची २० व २१ मार्च रोजी लुधियाना पंजाब या ठिकाणी होणा-या मास्टर भारत श्री २०२१” या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आलेली आहे.

Leave a Comment