चालू घडामोडी | 16 जुलै 2020

0

जागतिक युवा कौशल्य दिन: 15 जुलै

दरवर्षीप्रमाणे 15 जुलै 2020 रोजी जगभरात “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ” या संकल्पनेखाली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा करण्यात येत आहे.

यावर्षी भारतात ‘कौशल्य भारत’ अभियान सुरू करण्यात आल्याचा पाचवा वर्धापनदिन म्हणून हा दिवस साजरा होत आहे. कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयातर्फे या दिवशी एका डिजिटल परिषदेचे आयोजन करण्यात आले.

‘कौशल्य भारत’ अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. देशातील युवा वर्गाला अर्थार्जनाला उपयुक्त अशी कौशल्ये देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची त्यांची उत्पादकता अधिक वाढवणे हा यामागचा हेतू आहे.

डीआरडीओने पी 7 हेवी ड्रॉप सिस्टम विकसित केली :

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने एक पी 7 हेवी ड्रॉप सिस्टम (P7 Heavy Drop) विकसित केली आहे जी आयएल 76 विमानापासून 7-टन वजनाच्या वर्गात सैनिकी स्टोअर सोडण्यास सक्षम आहे.

ही यंत्रणा संपूर्णपणे स्वदेशी आहे आणि ऑर्डनन्स फॅक्टरीद्वारे उत्पादित पॅराशूट प्लॅटफॉर्म सिस्टम बनवणाऱ्या L&T द्वारे उत्पादित केली जात आहे.

सिंगापूरचा जीडीपी ४१ टक्क्यांनी घसरला :

करोनाचा हाहाकार सगळ्या जगात जाणवतो आहे. अशात लॉकडाउन जाहीर केला जाणं ही अनिवार्य बाब आहे. मात्र त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आहे.

सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची वाताहात झाली आहे कारण त्यांचा जीडीपी १० किंवा १२ नाही तर तब्बल ४२ टक्क्यांनी घसरला आहे. आशियाई देशांमध्ये सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला बसलेला हा सर्वात मोठा फटका आहे. Bloomberg ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मागील तिमाहीत जीडीपी ४१.२ टक्के म्हणजे जवळपास ४२ टक्के खाली गेला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा निचांक आहे असं सिंगापूरच्या वाणिज्य व्यापार मंत्र्यांनी म्हटलं आहे.

हेमांग अमिन बीसीसीआयचे हंगामी सीईओ :

राहुल जोहरी यांचा सीईओ पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे Chief Operating Officer हेमांग अमिन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओ पदावर नियुक्ती केली आहे.

पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत बीसीसीआयने सीईओ पदावर नवीन नियुक्ती करणं अपेक्षित आहे. २०१७ पासून हेमांग अमिन आयपीएलमध्ये Chief Operating Officer पदावर काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here