चालू घडामोडी | 16 फेब्रुवारी 2021

 • फ्लिपकार्ट कंपनीने ई-कॉमर्स मंचावर स्थानिक कारागीर आणि लहान तसेच मध्यम उद्योगांना आणण्यासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाबरोबर करार केला.
 • ताज्या जागतिक पर्यटन निर्देशांकाच्या मानांकन यादीत भारताचा क्रमांक – 34 वा.
 • विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) 11 फेब्रुवारी रोजी विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त सन 2021 साठी एसईआरबी महिला उत्कृष्टता पुरस्कार जाहीर केला आहे.
 • भारतातील पहिले परिपूर्ण विकसित आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज टर्मिनल – सागरिका क्रूझ टर्मिनल (कोची, केरळ).
 • केंद्रीय सरकारने भू-स्थानिक माहिती संपादन आणि उत्पादन नियंत्रित करणाऱ्या धोरणांच्या उदारीकरणाची घोषणा केली, ज्याच्या अंतर्गत ____ संस्थांवर या क्षेत्रासाठी कोणतेही बंधन लादले जाणार नाहीत – भारतीय संस्था.
 • बायोमेट्रिक्स  सारख्या पर्यायांद्वारे UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारास अधिकृत करण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेले जागतिक हॅकाथॉन – ‘NPCI पेऑथ चॅलेंज’.
 • जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान – अहमदाबाद, गुजरात.
 • फलंदाजांच्या ‘ICC टी-20 आंतरराष्ट्रीय’ क्रमवारीत द्वितीय क्रमांक कायम राखणारा भारतीय खेळाडू – के. एल. राहुल.
 • या राज्य सरकारने राज्यभरात छोटी-छोटी संग्रहालये स्थापन करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे – केरळ.
 • केरळ सरकारने केरलाम संग्रहालय नावाने एक संस्था तयार केली आहे, ज्याकडे संग्रहालये तयार करणे आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारी आहे.
 • 15 फेब्रुवारी 2021 रोजी, _____ येथे ‘पहेला फागुन’ वसंतोत्सव साजरा करण्यात आला – ढाका, बांगलादेश.
 • वर्ष 2030 पूर्वी 1.5 युरो प्रती किलोग्रॅम या दराने 100 टक्के हरित हायड्रोजन वितरित करण्याच्या उद्दीष्टाने युरोपचा हरित हायड्रोजन उपक्रम – ‘हायडिल (HyDeal) अॅम्बिशन’.
 • 2013-2016 या काळात झालेल्या भीषण उद्रेकानंतर, प्रथमच फेब्रुवारी 2021 मध्ये ___ देशात इबोला रोगाचे रगण आढळून आले आहे – गिनिया.
 • अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर देशभरातील देशी कारागीर आणि कारागीरांची 26 वीं हुनर हाट आयोजित करीत आहे.
 • रविचंद्रन अश्विन डावखुरा फलंदाजांविरुद्ध 200 गडी बाद करणारा कसोटी क्रिकेटच्या 143 वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 16 फेब्रुवारी 2021”

Leave a Comment