चालू घडामोडी | 15 सप्टेंबर 2020

ECOSOC या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली :

(ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. युक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. “प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला.

या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.

भारतीय संशोधकांनी 400 जायंट रेडिओ गॅलक्सी (GRG) शोधल्या :

विश्वातल्या सर्वात मोठ्या एकल अंतराळ घटकांचा म्हणजेच जायंट रेडिओ गॅलक्सी (GRG) यांचा एक संपूर्ण नकाशा आणि एकात्मिक माहिती संग्रह तयार करण्याच्या प्रयत्नात खगोलशास्त्रज्ञ आहेत.

इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे आणि नेदरलँडच्या लिडेन विद्यापीठ यांच्या संशोधकांच्या चमूने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रतीक दाभाडे हे चमूचे नेतृत्व करीत आहेत.

राष्ट्रीय अभियंता दिन: 15 सप्टेंबर

भारतात ‘अभियंता दिन’ हा 15 सप्टेंबरला साजरा केला जातो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.

‘भारत रत्न’ विश्वैश्वरय्या यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले.

जीडीपी नऊ टक्क्यांनी घटणार :

लॉकडाऊन व कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे अनिश्चिततेचे सावट दीर्घकालिन राहणार आहे. भारतात गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर दीर्घकाळापर्यंत विपरीत परिणाम राहणार आहे. परिणामी आर्थिक वर्ष २०२० ते २१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.

मार्च ते जून २०२० या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरली. कोरोनाची जागतिक महामारी, तिला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाऊन यामुळे खासगी क्षेत्रातील एकूण खरेदीक्षमता तब्बल २६.७ टक्क्यांनी घटली, तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली.

मात्र समाधानकारक पावसामुळे कृषि क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणीला थोडाफार चाप बसल्याचेही या कालावधीत दिसून आले आहे.

Leave a Comment