चालू घडामोडी | 15 जून 2020

रशियाच्या विजयी दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग :

पहिल्यांदाच भारतानं आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. परंतु २४ जून रोजी पार पडणाऱ्या या परेडमध्ये लष्कर, हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार आहे.

रशियामध्ये दरवर्षी ९ मे रोजी विजय दिवसाच्या निमित्तानं या परेडचं आयोजन केलं जातं. परंतु करोनामुळे यावेळी त्याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. १९४५ मध्ये नाझी जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

गेल्यावर्षी व्लादिवोस्तोकमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, आता भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ७५ ते ८० जवान १९ जून रोजी या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यावर्षी रशियाच्या विजयी दिवसाचं ७५ वं वर्ष असल्यानं रशियानं अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धामध्ये भारतीय सैनिकांच्या योगदानाचा संदर्भ देऊन परेडमध्ये भारताची टीम सहभागी होण्याची शक्यता आहे.

12 मोठ्या सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षऱ्या :

महाराष्ट्रातील अर्थचक्र गती देण्यासाठी 12 मोठ्या सामंजस्य करारांवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षºया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या करारांमुळे आपला मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात होईल.

त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, 40,000 एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून 48 तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो यासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारदेखील उपलब्ध होईल, असा दावाही सूत्रांनी केला.

रिझर्व्ह बँकेनी बँकेचे CEO आणि पूर्ण-वेळ संचालकांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला :

बँकिंग क्षेत्रातला कारभार सुव्यवस्थित करण्याच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष करण्याचा आणि प्रवर्तक गटाशी संबंधित असलेल्यांसाठी जास्तीत जास्त 10 वर्षाचा कार्यकाळ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

चांगल्या प्रशासन प्रवृत्तीची प्रबळ संस्कृती क्षेत्रात रुजविण्यासाठी आणि मालकांना व्यवस्थापनातून वेगळे करण्याचे सिद्धांत अवलंबण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण-वेळ संचालक या पदांसाठीचा कार्यकाळ मर्यादित ठेवणे इष्ट आहे, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.

कालापानी, लिपुलेखमधील जमीन भारतीय ग्रामस्थांच्या नावावर :

उत्तराखंडमधील कालापानी व लिपुलेख हे भाग नेपाळने त्यांच्या नकाशात दाखवले असले तरी जमिनीच्या नोंदीनुसार तो भारताचा भाग आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्थानिक नोंदीनुसार कालापानी व लिपुलेख हे दोन्ही भाग जेथे आहेत ती जमीन भारतातील दोन खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.

लिपुलेख, कालापानी, नाभीधांग या भारत-नेपाळ सीमेवरील भागातील जमीन गरबियांग व गुंजी या धारचुला विभागातील खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे. हा भाग पिठोरगड जिल्ह्य़ात येतो, असे धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी ए. के. शुक्ला यांनी सांगितले. कैलाश मानसरोवर यात्रा दरवर्षी भारत-चीन सीमेवर लिपुलेख मार्गे जात असते.

गारबीयांगच्या ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी कालापानी येथे 1962 च्या चीन युद्धापूर्वी शेती सुरू केली होती. कृष्णा गाब्रियाल यांनी सांगितले की, 1962 पूर्वी तेथे कडधान्ये पिकवली जात होती. काली नदी ही नेपाळ व भारत यांच्या सीमेवर आहे.

Leave a Comment